सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंड संघानेही पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघ तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानात क्रिकेट सामने खेळणार होता. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जाणार होती. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने दौरा रद्द केल्याने संपूर्ण जगात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून पाकिस्तानकडे पाहिलं जातं आहे. त्यानंतर आता पाकिस्तानमधील मंत्री तोंड लपवण्यासाठी भारताकडे बोट दाखवू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धमकी एका ईमेलद्वारे मिळाली होती, असं पाकिस्तानचे सूचना व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितलं आहे. “न्यूझीलंड क्रिकेट संघाला पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याची धमकी भारतातून आली होती. तसेच ईमेल हा भारतातून आला होता”, असं पाकिस्तानातील मंत्री फवाद चौधरी यांनी दावा केला आहे. “सिंगापूर स्थान दाखवणाऱ्या व्हीपीएनद्वारे भारतातून हा ईमेल तयार करण्यात आल आहे.” असंही त्यांनी पुढे सांगितलं. दुसरीकडे, संघ मायदेशी परतल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने धमकीची माहिती मिळाली, पण तपशील दिला नसल्याचं सांगितलं. तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही.

IPL 2021: माजी क्रिकेटपटू म्हणतो, “स्पर्धा संपण्याआधीच विराट कोहली…”

यापूर्वी मार्च २००९ मध्ये लाहोरच्या स्टेडियमबाहेर कसोटी सामना खेळण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ज्यात श्रीलंकेचे खेळाडू जखमी झाले होते. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघही पाकिस्तान मालिका खेळण्यासाठी येत होता. मात्र किवी संघाला श्रीलंका संघावर लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला झाल्याचं समजताच, ते अर्ध्यावरून मायदेशी परतलो होते.

More Stories onपीसीबीPCB
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newzealand tour suspend pakistan minister blame on india rmt
First published on: 22-09-2021 at 16:48 IST