फिफा विश्वचषक विजयात जर्मनवासीय अक्षरश: न्हाऊन निघत आहेत. या रविवारी जर्मनीत होणाऱ्या फॉम्र्युला वन ग्रां. प्रि. शर्यतीसाठी मर्सिडिझचा ड्रायव्हर निको रोसबर्गने विश्वचषकाचे चित्र आणि जर्मनीचे तीन तारे (स्टार) असलेले खास हेल्मेट तयार केले होते. पण विश्वचषकाचे चित्र असल्यामुळे जागतिक फुटबॉल महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर त्याने या हेल्मेटसह शर्यतीत उतरण्याचा विचार बदलला.
जर्मन फुटबॉल असोसिएशन पुरस्कर्ते असलेल्या मर्सिडिझ संघाचे प्रतिनिधित्व जर्मनीचा ड्रायव्हर रोसबर्ग करत आहे. जर्मनीचा झेंडा तसेच चार तारे आणि वरती विश्वचषकाचे छायाचित्र, असे विशेष हेल्मेट रोसबर्गने ट्विटरवरील आपल्या चाहत्यांना दाखवले होते. ‘‘हॉकेनहॅम शर्यतीसाठी हे विश्वचषक विजयाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेले माझे विशेष हेल्मेट आहे. तुम्हाला ते कसे वाटते?’’ असा प्रश्नही रोसबर्गने चाहत्यांना विचारला होता. पण स्वामित्वहक्कामुळे फिफाने या हेल्मेटला ‘रेड कार्ड’ दाखवल्यानंतर रोसबर्गने दुसरे हेल्मेट तयार केले. त्यावर आता एक मोठा तारा आणि तीन छोटे तारे (जर्मनीची चार विश्वविजेते दाखवणारे) ठेवण्यात आले आहेत.
‘‘हेल्मेटवर विश्वचषक असो वा नसो, माझ्यासाठी हा अविश्वसनीय क्षण आहे. विश्वचषकाचे चित्र असल्यामुळे हेल्मेटची शोभा आणखीन वाढली होती. पण आता हेल्मेटवर मोठा तारा ठेवण्यात आला आहे. हा तारा आमचा असल्यामुळे तो आमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही,’’ असे रोसबर्गने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jul 2014 रोजी प्रकाशित
रोसबर्गच्या खास हेल्मेटला फिफाचे ‘रेड कार्ड’
फिफा विश्वचषक विजयात जर्मनवासीय अक्षरश: न्हाऊन निघत आहेत. या रविवारी जर्मनीत होणाऱ्या फॉम्र्युला वन ग्रां. प्रि. शर्यतीसाठी मर्सिडिझचा ड्रायव्हर निको रोसबर्गने विश्वचषकाचे चित्र आणि जर्मनीचे तीन तारे (स्टार) असलेले खास हेल्मेट तयार केले होते.

First published on: 18-07-2014 at 05:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nico rosberg scraps plan to wear world cup trophy helmet