या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपण उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा अव्वल फलंदाज एबी डी’व्हिलियर्स निवृत्त होणार, अशा चर्चाना ऊत आला होता. पण आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार नसल्याचे डी’व्हिलियर्सने स्पष्ट केले आहे.

कसोटी संघात तू आम्हाला कधी दिसणार, असा प्रश्न डी’व्हिलियर्सला विचारला होता. त्यावर तो म्हणाला की, ‘‘हा प्रश्न चांगला आहे. पण सध्या तरी मी कसोटी संघात दिसणार नाही. मी दुखापतीतून सावरलो आहे, पण अजून काही गोष्टींचा मला विचार करायचा आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेने एकदाही विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे देशाला विश्वचषक जिंकवून देणे, या गोष्टीला मी सर्वप्रथम प्राधान्य देईन.’’

तो पुढे म्हणाला की, ‘‘न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत न खेळण्याचा निर्णय मी घेतला आहे. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र मी संघनिवडीसाठी उपलब्ध आहे. या साऱ्या गोष्टींचा अर्थ मी कसोटी क्रिकेट यापुढे खेळणार नाही, असा होत नाही. काही गोष्टींचा विचार मी करत आहे. त्यासाठी थोडा अवधी लागेल.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not thinking about test retirement says ab de villiers
First published on: 18-01-2017 at 00:07 IST