मेलबर्न : ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचा चौथा दिवस धक्कादायक निकालांचा ठरला. दुसरा मानांकित कॅस्पर रूड, आठवा मानांकित टेलर फ्रिट्झ आणि १२वा मानांकित अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह या आघाडीच्या पुरुष टेनिसपटूंचे आव्हान गुरुवारी दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. नऊ वेळा विजेत्या नोव्हाक जोकोव्हिचला मात्र तिसरी फेरी गाठण्यात यश आले.

दुसऱ्या मानांकित नॉर्वेच्या रूडला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, त्याने दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या बिगरमानांकित जेन्सन ब्रूक्सबीकडून ३-६, ५-७, ७-६ (७-४), २-६ अशी हार पत्करली. बिगरमानांकित ऑस्ट्रेलियाच्या अलेक्सी पॉपिरीनने पाच सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत फ्रिट्झला ६-७ (४-७), ७-६ (७-२), ६-४, ६-७ (६-८), ६-२ असे नमवले.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार
Shubman Gill fined 12 lakhs
IPL 2024 : गुजरात टायटन्सला पराभवानंतर आणखी एक धक्का, कर्णधार शुबमन गिलला ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड

ऑलिम्पिक विजेत्या आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेतील माजी उपविजेत्या जर्मनीच्या झ्वेरेव्हने जागतिक क्रमवारीत १०७व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या मायकल ममोहकडून ७-६ (७-१), ४-६, ३-६, २-६ असा पराभव पत्करला. २३वा मानांकित अर्जेटिनाचा दिएगो श्वाट्झमनही दुसऱ्या फेरीत गारद झाला. अमेरिकेच्या जेजे वोल्फने त्याला ६-१, ६-४, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

गतविजेता राफेल नदाल स्पर्धेबाहेर झाल्यानंतर जेतेपदासाठी प्रमुख दावेदार असलेल्या जोकोव्हिचने विजयी घोडदौड कायम राखली. चौथ्या मानांकित जोकोव्हिचने फ्रान्सच्या एन्झो क्वॅकूवर ६-१, ६-७ (५-७), ६-२, ६-० अशी मात केली.

महिला एकेरीत कॅरोलिन गार्सिया आणि अरिना सबालेंका या अनुक्रमे चौथ्या व पाचव्या मानांकित खेळाडूंना आगेकूच करण्यात यश आले. फ्रान्सच्या गार्सियाने कॅनडाच्या लैला फर्नाडेझला ७-६ (७-५),

७-५ असे, तर सबालेंकाने अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सला ६-३, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

सानिया-डॅनिलिनाची विजयी सुरुवात

कारकीर्दीतील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणाऱ्या भारताच्या सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची विजयी सुरुवात केली. सानियाने कझाकस्तानच्या अ‍ॅना डॅनिलिनाच्या साथीने खेळताना महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत हंगेरीची दलमा गाल्फी आणि अमेरिकेची बर्नार्डा पेरा या जोडीचा ६-२, ७-५ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत रामकुमार रामनाथन, तसेच युकी भांब्री-साकेत मायनेनी जोडीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. मेक्सिकोच्या मिग्वाइल अँजेल रेयेस-व्हरेलाच्या साथीने खेळणाऱ्या रामनाथनला स्टेफानोस आणि पेट्रोस या त्सित्सिपास बंधूंनी ६-३, ५-७, ३-६ असे नमवले. भांब्री-मायनेनी जोडीने आंद्रेस मिएस आणि जॉन पीर्स जोडीकडून ६-७ (५-७), ७-६ (७-४), ३-६ अशी हार पत्करली.