ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील खेळाडूंना तयारीसाठी ५० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देणार असल्याची घोषणा क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवणाऱ्या खेळाडूंचा तसेच प्रशिक्षकांचा पुण्यातील बालेवाडी संकुलात क्रीडामंत्र्यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या २४ खेळाडूंना तसेच १६ क्रीडा मार्गदर्शकांना जवळपास ९३ लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. यात नेमबाज पूजा घाटकर, सुमा शिरूर यांच्यासह कुस्तीपटू राहुल आवारे आणि अन्य खेळाडूंचा समावेश आहे.