अमेरिकन बॉक्सर फ्लॉइड मेवेदर याच्याविरुद्धच्या लढतीपूर्वी फिलीपाइन्सचा बॉक्सर मॅन्नी पकिआओ याने खांद्याची दुखापत लपवल्यामुळे नेवाडा बॉक्सिंग असोसिएशनकडून त्याच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पकिआओच्या खांद्याला दुखापत होती, याची माहिती असतानाही असोसिएशनने त्याची तपासणी का केली नाही, असा सवाल करीत नेवाडा अ‍ॅथलेटिक कमिशनचे कार्याध्यक्ष फ्रान्सिस्को अ‍ॅग्युेलर यांनी या प्रकरणाची चौकशी वकील करणार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, ‘‘ आम्ही सर्व तथ्य तपासून पाहणार आहोत आणि परिस्थितीचीही पाहणी करणार आहोत. याच वेळी आम्ही इतर मुद्दय़ांवरही चर्चा करणार आहोत. तसेच खेळाडूने वेळोवेळी माहिती देणे आवश्यक असल्याची खातरजमा आयोगाने करणे आवश्यक आहे.’’ पकिआओ याने सामन्यापूर्वी भरलेल्या करारपत्रातील प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली असल्यास त्याच्यावर दंड किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येईल. दरम्यान, पुढील आठवडय़ात पकिआओवर शस्त्रक्रिया होणार असल्याचे, अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉ. नील एलट्राचे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pacquiao could face disciplinary action for shoulder injury
First published on: 06-05-2015 at 03:12 IST