scorecardresearch

Premium

PAK vs ENG: जेम्स अँडरसनच्या अफलातून चेंडूवर रिझवान झाला क्लीन बोल्ड, बाद होताच पाहत राहिला एकटक

पाकिस्तान आणि इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. त्याचबरोबर तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर पाकिस्तान विजयासाठी १५७ धावांची गरज आहे.

Test Rizwan was clean bowled by James Anderson's brilliant ball but looked on as he got out
विकेट घेतल्यानंतर जल्लौष करताना जेम्स अँडरसन (संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

पाकिस्तान विरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात, इंग्लंडचा दुसरा डाव २७५ धावांवर आटोपला. इंग्लंडने पाकिस्तानला विजयासाठी ३५५ धावांचे लक्ष्य दिले आहे. दुसऱ्या डावात मोहम्मद रिझवान पाकिस्तानकडून सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला, पण ४० वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने त्याच्या किलर बॉलवर रिझवानला बोल्ड केले. रिझवान कसा बाद झाला, याचा त्याला विश्वास बसला नाही.

कारण त्याला काही समजायच्या आतच चेंडू यष्टीवर आदळला होता. आऊट झाल्यानंतर रिझवानची ज्या पद्धतीने प्रतिक्रिया होती, ते पाहता तो बाद झाल्याचे खात्री नसल्याचे दिसत होते. वास्तविक, रिझवानला जो चेंडू टाकला गेला, तो चेंडू अशा प्रकारे फेकला गेला की खेळपट्टीला आदळल्यानंतर चेंडू स्टंपच्या आत जाण्यापूर्वी चेंडूने हवेतच आपली दिशा बदलली. त्याचवेळी, रिझवान बचावात्मक पद्धतीने बॅटला चेंडूच्या रेषेत आणण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू बॅटला आदळण्याऐवजी चेंडू सरळ ऑफ-स्टंपवर जाऊन आदळला. हे पाहून रिझवान देखील अवाक झाला. त्यामुळे पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात रिझवानला ४३ चेंडूत केवळ ३० धावा करता आल्या.

PAK vs NED Match Updates in Cricket World Cup 2023
World Cup 2023, PAK vs NED: विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांची दमछाक, नेदरलँडसमोर ठेवले २८७ धावांचे लक्ष्य
Suryakumar Yadav has a game that creates fear among his opponents Virender Sehwag big statement
Virender Sehwag: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘मिस्टर ३६०’ने केलेल्या अर्धशतकावर सेहवागचे सूचक विधान; म्हणाला, “सूर्यकुमारची फलंदाजी…”
spinners take all wickets against India
IND vs SL: श्रीलंका संघाने रचला इतिहास! भारताविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ
Kuldeep takes five wickets against Pakistan
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर कुलदीप यादवचा वाढला आत्मविश्वास; म्हणाला, ‘मी निवृत्तीनंतरही…’

रिझवान बाद होताच काही वेळ त्याच पोझमध्ये उभा राहिला आणि गोलंदाज अँडरसनच्या चेहऱ्याकडे एकटक बघत राहिला. खेळपट्टीवर काही वेळ घालवल्यानंतर पाकिस्तानी फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्यानंतर अँडरसनच्या गोलंदाजीवर चाहते सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. ‘सिंह नक्कीच म्हातारा झाला आहे, पण शिकार करायला विसरला नाही’ असंही लोक लिहू लागले आहेत.

हेही वाचा – सुपर ओव्हरमध्ये भारताचा रोमहर्षक विजय; ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला

कसोटी क्रिकेटमध्ये रिझवान गोलंदाज तिसऱ्यांदा अँडरसनचा बळी ठरला आहे. पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा पाकिस्तान संघाने ४ विकेट्स गमावून १९८ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना विजयासाठी १५७ धावांची गरज आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pak vs eng 2nd test rizwan was clean bowled by james andersons brilliant ball but looked on as he got out vbm

First published on: 12-12-2022 at 08:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×