पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघांत पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. कराची कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी असे काही घडले आहे, ज्याची चर्चा होत आहे. खरे तर कसोटी सामन्याचा तिसरा दिवस सुरू झाला तेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मैदानावर आला नव्हता. अशा स्थितीत मोहम्मद रिझवान त्याच्या जागी पर्याय कर्णधार म्हणून मैदानात उतरला. पण पहिल्या सत्रात रिझवान एखाद्या ‘कर्णधारा’प्रमाणे आपल्या खेळाडूंना सूचना देताना दिसला.

वास्तविक, नियमांनुसार, पर्यायी खेळाडू मैदानावरील खेळाडूंना सूचना देऊन क्षेत्ररक्षणाची स्थिती बदलू शकतो. परंतु त्याला ‘कर्णधार’ प्रमाणे डीआरएस रिव्ह्यू घेण्याची परवानगी नाही. क्रिकेटचा नियम 24.1.2 सांगतो की, ‘बदली खेळाडू थेट सामन्यात गोलंदाजी करू शकत नाही आणि कर्णधार म्हणून काम करू शकत नाही. पण पंचांच्या संमतीने तो खेळाडू सामन्यात यष्टिरक्षकाची भूमिका बजावू शकतो.

MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: “अरे २ ओव्हरमध्ये २४ धावा सहज होतील…” शशांक आणि आशुतोषने सांगितला किस्सा, शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं बोलणं, पाहा व्हीडिओ
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

पण जेव्हा न्यूझीलंडच्या डावाच्या ५३व्या षटकात डेव्हन कॉनवेला पायचित अपील करण्यात आली आणि डीआरएस रिव्ह्यू घेण्याची वेळ आली. तेव्हा माजी कर्णधार यष्टीरक्षक सर्फराज अहमद आणि रिझवान डीआरएस घेण्यासाठी पंचांशी बोलले, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. बाबरऐवजी स्टँड-इन कॅप्टनची भूमिका कोण करत आहे. त्याचवेळी रिव्ह्यू घेण्यात आला आणि कॉनवे बाद झाला, पण नंतर बाबरच्या जागी काळजीवाहू कर्णधाराची भूमिका कोण बजावत आहे, हे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा – Arjun Saud Keeping: नेपाळ टी-२० लीगमध्ये दिसली धोनीची झलक; कॅप्टन कूलप्रमाणे यष्टीरक्षण करतानाचा व्हिडिओ व्हायरल

जेव्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले. मैदानावर बाबरच्या जागी रिजवान नसून सर्फराज स्टँड इन कॅप्टनची भूमिका बजावत आहे. हा सर्व गोंधळ बाबर आझम बाहेर असल्याने झाला होता. रिपोर्टनुसार, बाबर (बाबर आझम) विषाणूजन्य फ्लूने त्रस्त झाल्यामुळे तिसऱ्या दिवशी मैदानात येऊ शकला नाही.