भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणावपूर्ण वातावरणामुळे विश्वचषकासाठी पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाचे भवितव्य अजूनही अंधारात आहे. पण या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांचे प्रयत्न सुरू आहेत.
बीसीसीआयने सध्याच्या परिस्थितीची माहिती आयसीसीला दिली आहे. कोलकाता किंवा बंगळुरू या ठिकाणी सामने भरवण्याचे बीसीसीआय विचार करीत असून ओडिशा क्रिकेट असोसिएशनने या सामन्यांसाठी उपलब्धता दर्शवली आहे.
या सामन्यांच्या ठिकाणांसाठी बीसीसीआय प्रयत्न करीत असून याबद्दलची माहिती आयसीसीला कळवत आहे. त्यामुळे लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.