पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा या दोन भारतीय स्नूकरपटूंनी केलेल्या जिगरबाज खेळाच्या जोरावर भारताने IBSF सांघिक स्नूकर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानवर मात केली आहे. सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये भारत सामन्यात ०-२ असा पिछाडीवर पडला होता. मात्र मनन चंद्रा आणि पंकज अडवाणीने धडाकेबाज खेळी करत सामन्यात भारताचं आव्हान कायम ठेवलं.

याआधी भारतीय खेळाडूंनी सामन्यात अडखळती सुरुवात केली होती. मनन चंद्रा आणि पंकज अडवाणीला मैश आणि आसिफ या पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्यांकडून हार पत्करावी लागली. ज्यामुळे पहिल्या दोन सेट्समध्ये पाकिस्तान आघाडीवर गेला. मात्र यानंतर भारतीय खेळाडूंनी आपला सर्व अनुभव पणाला लावत पाकिस्तानला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही.