स्नूकर व बिलियर्ड्स या दोन खेळांच्या कात्रीत सापडलेल्या पंकज अडवाणी याने व्यावसायिक स्नूकर स्पर्धेऐवजी बिलियर्ड्सच्या इंडियन ओपन व जागतिक अजिंक्यपद स्पर्धा या दोन स्पर्धामध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंकज याबाबत म्हणाला की, ‘‘पुण्यात १५ ते १९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या इंडियन ओपन स्पर्धेच्या पात्रता फेरीत मी सहभागी होणार आहे. त्यानंतर लगेच मी जागतिक स्पर्धेत सहभागी होईन. अर्थात त्यासाठी मला पात्रता निकष पूर्ण करावे लागणार आहेत. स्नूकर व बिलियर्ड्स या दोन्ही खेळांत अव्वल यश मिळविण्याच्या हेतूने मला या स्पर्धाबाबत निर्णय घेता आला नव्हता. बऱ्याच दिवसांत मी बिलियर्ड्सच्या अव्वल स्पर्धामध्ये भाग घेतला नव्हता.’’ अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून मला खूप काही शिकावयास मिळाले आहे. पुन्हा काही कालावधीनंतर मी स्नूकरमध्येही भाग घेईन,’’ असे पंकजने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Sep 2014 रोजी प्रकाशित
पंकज अडवाणी इंडिया ओपन बिलियर्ड्स स्पर्धेत खेळणार
स्नूकर व बिलियर्ड्स या दोन खेळांच्या कात्रीत सापडलेल्या पंकज अडवाणी याने व्यावसायिक स्नूकर स्पर्धेऐवजी बिलियर्ड्सच्या इंडियन ओपन व जागतिक अजिंक्यपद स्पर्धा या दोन स्पर्धामध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
First published on: 06-09-2014 at 02:33 IST
TOPICSपंकज अडवाणी
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaj advani to play in indian open billiards