scorecardresearch

अॅमस्टरडॅममध्ये पी. कश्यपचा पासपोर्ट हरवला, क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड आले मदतीला धावून

कश्यप डेन्मार्क ओपनमध्ये होणार सहभागी

अॅमस्टरडॅममध्ये पी. कश्यपचा पासपोर्ट हरवला, क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड आले मदतीला धावून

अॅमस्टरडॅम येथे स्पर्धेदरम्यान भारतीय बॅडमिंटनपटू पी. कश्यपचा पासपोर्ट हरवल्याची घटना घडली. यामुळे डेन्मार्क ओपन स्पर्धेला जाण्यासाठी कश्यपपुढे मोठा यक्षप्रश्न उभा राहिला. यावेळी कश्यपने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली.

कश्यपने केलेल्या ट्विटची दखल घेत क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी परराष्ट्र मंत्रालयाती अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, कश्यपला डेन्मार्कच्या प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन दिली. यानंतर कश्यपनेही राज्यवर्धन राठोड यांचे आभार मानले.

पी. कश्यप आणि भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हे 16 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-10-2018 at 15:02 IST

संबंधित बातम्या