Mohsin Naqvi On BCCI: भारत विरूद्ब पाकिस्तान सामना हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात हाय व्हॉल्टेज सामन्यांपैकी एक आहे. जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमनसामने येतात तेव्हा दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळत असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका झालेली नाही. दोन्ही संघ केवळ आयसीसी आणि आशिया चषकात खेळण्यासाठी आमनेसामने आले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे अनेकदा द्विपक्षीय मालिकेसाठी विनंती केली आहे. मात्र, बीसीसीआयने ही विनंती नेहमीच फेटाळून लावली आहे.

भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार नाही, या भूमिकेवर ठाम आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले गेले होते. मात्र, भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे या स्पर्धेतील भारतीय संघाच्या सामन्यांचे आयोजन दुबईत केले गेले होते. २०२३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारतात केले गेले होते. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. मात्र, दोन्ही देशातील तणावाची स्थिती पाहता आशिया चषकात भारत- पाकिस्तान सामना होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी भारत सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारताचा संघ पाकिस्तानात जाणार नाही आणि पाकिस्तानचा संघ भारतात खेळण्यासाठी येऊ शकणार नाही. हे दोन्ही संघ कुठल्याही मोठ्या स्पर्धेत एकमेंकाविरूद्ध खेळू शकतात. पण दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिकेचे आयोजन केले जाणार नाही. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेअरमन मोहसिन नकवी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना बीसीसीआयला प्रत्युत्तर दिलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मोहसिन नकवी म्हणाले, ” आमची भूमिका स्पष्ट आहे. जेव्हा कधीही चर्चा होईल, तेव्हा भारताशी बरोबरीच्या पातळीवरच होईल. आता आम्ही कुठलीही चर्चा करण्यासाठी भीक मागणार नाही. तो काळ गेला, आता जे काही होईल ते समानतेच्या आधावरच होईल.” आशिया चषक २०२५ स्पर्धेला येत्या ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे . या स्पर्धेचे आयोजन युएईत केले जाणार नाही. या स्पर्धेत भारत- पाकिस्तान हे दोन्ही संघ १४ सप्टेंबरला आमनेसामने येणार आहेत. दरम्यान भारतीय संघ हा सामना खेळणार, की माघार घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.