मारिबोर (स्लोव्हेनिया) येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या जितू रायने एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. जितूने ६०० पैकी ५८४ गुणांची कमाई केली. स्पेनच्या कारेरा पाब्लोने रौप्य तर रशियाच्या गौरिनाव्ह अँटोने कांस्यपदक पटकावले. याच स्पर्धेत जितूने फ्री पिस्तूल प्रकारात २००.८ गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली होती. अशाप्रकारे विश्वचषकात दोन पदके पटकावणारा जितू पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे. विश्वचषकातले जितूचे हे सलग तिसरे पदक आहे. गेल्या महिन्यात म्युनिक येथे झालेल्या विश्वचषकात जितूने रौप्यपदकावर कब्जा केला होता. स्पर्धेतील अन्य भारतीय पी.एन.प्रकाशला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.