व्हिवो प्रो कबड्डी लीगचा थरार आता अतिम टप्प्यात पोहचला आहे. या हंगामातील दुसरा उपांत्य सामना तमिळ थलायवाज आणि पुणेरी पलटण यांच्यात पार पडला. या सामन्यात पुणेरी पलटणने तमिळ थलायवाजचा ३९-३७ असा पराभव केला. एका टप्प्यावर सात गुणांनी पिछाडीवर असूनही, पुणेरी पलटणने नेत्रदीपक पुनरागमन केले आणि पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. जिथे त्यांचा सामना जयपूर पिंक पॅथर्सशी होणार आहे.

जयपूरने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली –

जयपूरने बेंगळुरू बुल्सचा २० गुणांनी पराभव करून तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. पलटण प्रथमच फायनल खेळणार आहे. थलायवाजने प्रथमच प्लेऑफ आणि नंतर उपांत्य फेरी गाठली पण फायनल खेळण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. याचे कारण म्हणजे पंकज मोहिते (१६) याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. नरेंद्रने (१२) थलायवाजसाठी सुपर-१० पूर्ण केले पण तो पर्यंत उशीर झाला होता. अजिंक्य पवार (७) मुक्तपणे खेळू शकला नाही. येथे मोहम्मद नबीने (६) पंकजला चांगली साथ दिली. अशा प्रकारे पलटनने पिछाडीवर असतानाही २ गुणांच्या फरकाने अंतिम फेरी गाठण्याचा मान मिळविला.

Royal Challengers Bangalore Vs Kolkata Knight Riders Match Highlights in Marathi
KKR vs RCB : रोमहर्षक सामन्यात केकेआरचा आरसीबीवर एका धावेने निसटता विजय, विल जॅक्सची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ
Lucknow beat Gujarat by 33 runs in IPL 2024
LSG vs GT : लखनऊविरुद्धच्या पराभवानंतर शुबमन गिल संतापला; कोणावर फोडले खापर? घ्या जाणून
IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 DC vs CSK: धोनीच्या सुसाट खेळीने बायको साक्षीही भारावली, सामना हरल्याचं गेली विसरून…
Kwena Maphaka has recorded embarrassing record in IPL 2024
IPL 2024 : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वर्ल्डकप गाजवणाऱ्या मुंबईच्या गोलंदाजाची धुलाई; नावावर नोंदला गेला नकोसा विक्रम

मोहितेची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी –

अस्लम इनामदार आणि मोहित गोयत यांच्याशिवाय पलटणला सुरुवात केली. तिसऱ्या मिनिटाला नरेंद्रने दोन गुणांच्या चढाईने थलायवाजला ५-२ ने आघाडीवर नेले. त्यानंतर बचावफळीने आकाशला पकडत खाते उघडले. पलटणसाठी सुपर टॅकल ऑन होते. नरेंद्रला डॅश करण्यात आले आणि पलटणला २ गुण मिळाले. नबीने दोन गुणांच्या चढाईने धावसंख्या बरोबरी केली आणि ऑलआउटही टाळले. नबीने सलग दुसऱ्या चढाईत गुण मिळवले तेव्हा अजिंक्यने त्याला बाद करून बरोबरी साधली. त्यानंतर पलटनने आणखी एका सुपर टॅकलने स्कोअर ९-९ असा केला.

मात्र, थलायवाजने लगेचच पलटनला ऑलआउट करत १५-९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर पंकजने दोन गुणांची रेड केली आणि त्यानंतर बचावफळीने नरेंद्रची शिकार केली. सलग चौथ्या गुणासह पलटनने थलायवाजला सुपर टॅकल स्थितीत आणले, पण त्याने पंकजची पकड केली. पूर्वार्धाच्या शेवटी, पलटनने थलायवाजला पुन्हा एकदा सुपर टॅकल परिस्थितीत आणले आणि थलायवाजने पुन्हा एकदा पंकजला सुपर टॅकल करून अंतर ६चे केले. या हाफमध्ये थलायवाजला रेडमध्ये ७ गुण, बचावात ९, ऑलआउटमध्ये २ आणि ३ अतिरिक्त गुण मिळाले. पलटनने चढाईत ८ गुण आणि बचावात ७ गुण मिळवले.

पंकजच्या सुपर-१० ने पलटनला मिळाली आघाडी –

पलटनच्या बचावफळीने नरेंद्रला पाचव्यांदा बाद केले आणि त्यानंतर पंकजने साहिलला बाद करून गती बदलली. पण हिमांशूविरुद्ध पंकजने टॅकलची चूक केली. चौघांच्या बचावासाठी, आकाशने करो या मरोच्या चढाईवर येऊन अंकितची शिकार केली आणि थलायवाजला एका सुपर टॅकल परिस्थितीत आणले. त्यानंतर बचावफळीने अजिंक्यला बाद करत थलायवाजला ऑलआऊटच्या दिशेने ढकलले आणि त्यानंतर स्कोअर २४-२३ असा केला.

हेही वाचा – IND vs BAN 1st Test: बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर गारद; भारताकडे २५४ धावांची आघाडी

थलायवाजच्या बचावफळीच्या चुकांमुळे पलटन अंतिम फेरीत –

पाच मिनिटे बाकी होती आणि स्कोअर ३०-३० असा होता. फझलने अजिंक्यला पकडत थलायवाजला सुपर टॅकल स्थितीत ढकलले. त्यानंतर पंकजने पलटनला दोन गुणांच्या चढाईने ३३-३० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पलटनने थलायवाजला प्रथमच ऑलआऊट करत आघाडी ६ गुणांची केली. नरेंद्रने लागोपाठ तीन गुण घेत अंतर कमी केले. आकाशच्या चढाईवर दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला आणि त्यानंतर नबीने अजिंक्यला बाद करून अंतर ४चे केले. अशा पद्धतीने थलायवाजच्या बचावफळीतील चुकांच्या जोरावर पुणेरी पलटनने अंतिम फेरी गाठली.