मॅकलॅरेनच्या लुइस हॅमिल्टन याने मोसमातील अखेरच्या ब्राझीलियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत पोल पोझिशन पटकावली आहे. रविवारी होणाऱ्या मुख्य शर्यतीला तो पहिल्या क्रमांकावरून सुरुवात करेल.
हॅमिल्टनने एक मिनिट १२.४५८ सेकंद अशी वेळ देऊन पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले. त्याचा सहकारी जेन्सन बटन याने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली. रेड बुलचे ड्रायव्हर मार्क वेबर आणि सेबॅस्टियन वेटेल यांनी अनुक्रमे तिसरे आणि चौथे आले. वेटेल आणि फेरारीचा फर्नाडो अलोन्सो यांच्यापैकी विश्वविजेतेपद कोण पटकावतो, याकडे तमाम चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या दोघांमध्ये १३ गुणांचा फरक आहे. अलोन्सोला पात्रता फेरीत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2012 रोजी प्रकाशित
लुइस हॅमिल्टनला पोल पोझिशन
मॅकलॅरेनच्या लुइस हॅमिल्टन याने मोसमातील अखेरच्या ब्राझीलियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत पोल पोझिशन पटकावली आहे. रविवारी होणाऱ्या मुख्य शर्यतीला तो पहिल्या क्रमांकावरून सुरुवात करेल. हॅमिल्टनने एक मिनिट १२.४५८ सेकंद अशी वेळ देऊन पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले.
First published on: 25-11-2012 at 02:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pole position to lewis hamilton