इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल : सदरलॅण्डला पराभवाचा धक्का

वेस्ट हॅम युनायटेडने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत सदरलॅण्डला नमवत शानदार विजयाची नोंद केली. या विजयासह वेस्ट हॅमने खालच्या गटात होणारी गच्छंती टाळली आहे,

वेस्ट हॅम युनायटेडने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत सदरलॅण्डला नमवत शानदार विजयाची नोंद केली. या विजयासह वेस्ट हॅमने खालच्या गटात होणारी गच्छंती टाळली आहे, मात्र सदरलॅण्डवर हीच नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. या विजयामुळे अकराव्या स्थानी असणाऱ्या वेस्ट हॅमचे ३७ गुण झाले आहेत, तर पराभवामुळे सदरलॅण्ड २५ गुणांसह शेवटून दुसऱ्या स्थानी आहे. अँडी कॅरोलने मार्क नोबेलच्या कॉर्नरवर हेडरद्वारे सुरेख गोल करत वेस्ट हॅमचे खाते उघडले. लिव्हरपूलकडून वेस्ट हॅमच्या ताफ्यात दाखल झालेल्या कॅरोलसाठी यंदाच्या हंगामातला केवळ दुसरा गोल होता.
मध्यंतरानंतर मोहम्मद डिआमने सदरलॅण्डचा गोलरक्षक व्हिटो मॅनोनला भेदत शानदार गोल केला. सुदरलँडतर्फे अ‍ॅडम जॉन्सनने गोल करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. वेस्ट हॅमच्या आघाडीपटूंनी आघाडी बळकट करण्याचा प्रयत्न केला, मात्र सदरलॅण्डचा गोलरक्षक मॅनोनने अभेद्य बचावाचे प्रदर्शन करत वेस्ट हॅमची आगेकूच रोखली. मात्र गोल करण्यात अपयश आल्याने वेस्ट हॅमने २-१ फरकाने सामना जिंकला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Premier league west ham all but safe after win at sunderland

ताज्या बातम्या