पाटणा पायरेट्स संघ हा प्रो-कबड्डीच्या इतिहासातला सर्वात यशस्वी संघ मानला जातो. आतापर्यंत ३ हंगामांची विजेतेपद पाटणा पायरेट्स संघाने पटकावली आहेत. मात्र, सातव्या हंगामात पाटणा पायरेट्सची कामगिरी फारशी चांगली होत नाहीये. प्रदीप नरवालचा अपवाद वगळता एकही खेळाडू आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत नाहीये. सध्याच्या घडीला पाटणा पायरेट्सचा संघ गुणतालिकेत तळातल्या स्थानावर आहे. ४ सप्टेंबररोजी बंगळुरु बुल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात पाटण्याला एका गुणाच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. मात्र पाटण्याच्या प्रदीप नरवालने या सामन्यात एक अनोखं अर्धशतक झळकावलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळुरु बुल्सविरुद्धच्या सामन्यात प्रदीप नरवालने चढाईत १४ गुणांची कमाई केली. प्रो-कबड्डीच्या इतिहासात प्रदीप नरवालचा हा ५० वा ‘सुपर टेन’ ” ठरला आहे. (एका सामन्यात चढाईत १० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवण्याला प्रो-कबड्डीत ‘सुपर टेन’ म्हटलं जातं) केवळ ९७ सामन्यांमध्ये प्रदीपने ही कामगिरी करुन दाखवली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi 7 pradeep narwal creates record complete half century of super 10 psd
First published on: 07-09-2019 at 15:30 IST