प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील आजच्या सातव्या दिवशी दोन सामने होते आहेत. पहिला सामना पुणेरी पलटण आणि पाटणा पायरेट्स यांच्यात बंगळुरूच्या शर्टन मैदानावर व्हाईटफिल्डवर खेळला गेला. यामध्ये पाटणा पायरेट्सने दमदार खेळ करत पुणे पलटणचा १२ गुणांनी पराभव केला.
पाटणा पायरेट्सने पुणेरी पलटणचा ३८-२६ असा पराभव केला. हाफ टाइमपर्यंत १४-१४ अशी बरोबरी होती. यानंतर पाटणाने आपली आघाडी कायम ठेवत १२ गुणांनी विजय मिळवला.
पुणेरी पलटण आणि पाटणा पायरेट्स यांच्यात आतापर्यंत २-२ सामने झाले होते. दोघांनीही प्रत्येकी एक सामना जिंकला होता. पाटणा पायरेट्स गुणतालिकेत आठव्या तर पुणेरी पलटण दहाव्या क्रमांकावर होती. पाटणाचे सहा तर पुणेरी पलटणचे पाच गुण होते.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आता, आजचा दुसरा सामना हा तेलगू टायटन्स आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यात होणार आहे.