प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगामास आज (बुधवार)पासून धडाक्यात सुरूवात झाली. या हंगामासाठी एकूण १२ संघ सज्ज झाले आहेत. तर, हंगामातील पहिल्याच सामना आज गतविजेता संघ यू मुंबा विरूद्ध बंगळुरू बूल्स यांच्यात झाला. या उद् घाटनाच्या सामान्यात यू मुंबाने बंगळुरू बुल्सवर १६ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबईच्या विजयात अभिषेक सिंग हा हिरो ठरला.

आजच्य पहिल्या सामन्यात यू मुम्बाने बंगळुरू बुल्सला ४६-३० अशा फरकाने मात दिली. यू मुम्बाच्या विजयात मोठा वाटा असलेल्या अभिषेक सिंह याने १९ गुण मिळवले. तर बंगळुरूसाठी चंद्रन रंजीत याने सर्वाधिक १३ गुण प्राप्त केले. अभिषेकने या सामान्यात १५ रेड पॉ्ईंट्स आणि ४ बोनस गुण मिळवले. तर, मुंबईच्याच अजित कुमारने सहा गुण मिळवत संघाच्या विजयासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

आता दुसरा सामना हा तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलायवाज यांच्यात खेळला गेलेला सामना बरोबरीत सुटला. तेलुगू टायटन्सने आपला पराभव टाळण्यासाठी शानदार पुनरागमन केले आणि सामना ४०-४० असा बरोबरीत सामना सुटला. तमिळ थलायवाजसाठी मनजीत हा सामन्यातील सुपर रेडर होता त्याने एकूण १२ गुणांची कमाई केली. तर, यानंतर दिवसाचा शेवटचा सामना हा बंगाल वॉरियर्स आणि यूपी योद्धा यांच्यात खेळला जात आहे.

गेल्या वर्षी करोना महामारीमुळे ही लीग आयोजित करता आली नव्हती. अशा परिस्थितीत चाहते या रोमांचक लीगची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते.

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :

२२ डिसेंबर २०२१ : बंगळुरू बुल्स विरुद्ध यू मुंबा (संध्याकाळी ७:३० वाजता), तेलुगु टायटन्स विरुद्ध तमिळ थलायवाज (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि बंगाल वॉरियर्स विरुद्ध यूपी योद्धा (रात्री ९:३० वाजता).

२३ डिसेंबर २०२१ : गुजरात जायंट्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ७:३० वाजता), दबंग दिल्ली विरुद्ध पुणेरी पलटण (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पाटणा पायरेट्स (रात्री ९:३० वाजता).

२४ डिसेंबर २०२१ : यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्ली (संध्याकाळी ७:३० वाजता), तमिळ थलायवाज विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि बंगाल वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स (रात्री ९:३० वाजता).

२५ डिसेंबर २०२१ : पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ७:३० वाजता), पुणेरी पलटण विरुद्ध तेलुगू टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (रात्री ९:३० वाजता).

२६ डिसेंबर २०२१ : गुजरात जायंट्स विरुद्ध दबंग दिल्ली (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि बंगळुरू बुल्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

२७ डिसेंबर २०२१ : तमिळ थलायवाज विरुद्ध यू मुंबा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि यूपी योद्धा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

२८ डिसेंबर २०२१ : पुणेरी पलटण विरुद्ध पाटणा पायरेट्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि तेलुगु टायटन्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

२९ डिसेंबर २०२१ : दबंग दिल्ली विरुद्ध बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि यूपी योद्धा विरुद्ध गुजरात जायंट्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

३० डिसेंबर २०२१ : जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध यू मुंबा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि हरियाणा स्टीलर्स विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

३१ डिसेंबर २०२१ : तेलुगू टायटन्स विरुद्ध पुणेरी पलटण (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि पाटणा पायरेट्स वि. बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१ जानेवारी २०२२ : यू मुंबा विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ७:३० वाजता), बंगळुरू बुल्स विरुद्ध तेलुगू टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि दबंग दिल्ली विरुद्ध तमिळ थलवायज (रात्री ९:३० वाजता)

२ जानेवारी २०२२ : गुजरात जायंट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि पुणेरी पलटण विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

३ जानेवारी २०२२ : बंगाल वॉरियर्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि तेलुगु टायटन्स विरुद्ध पाटणा पायरेट्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

४ जानेवारी २०२२ : हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यू मुंबा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि यूपी योद्धा विरुद्ध तमिळ थलयवाज (संध्याकाळी ८:३० वाजता).

५ जानेवारी २०२२ : पुणेरी पलटण विरुद्ध गुजरात जायंट्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि दबंग दिल्ली विरुद्ध तेलुगु टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

६ जानेवारी २०२२ : पाटणा पायरेट्स विरुद्ध तामिळ थलायवास (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि बंगळुरू बुल्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

७ जानेवारी २०२२ : बंगाल वॉरियर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

८ जानेवारी २०२२ : यूपी योद्धा विरुद्ध दबंग दिल्ली (संध्याकाळी ७:३० वाजता), यू मुंबा विरुद्ध तेलुगु टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि गुजरात जायंट्स विरुद्ध पाटणा पायरेट्स (रात्री ९:३० वाजता).

९ जानेवारी २०२२ : पुणेरी पलटण विरुद्ध बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) विरुद्ध बंगळुरू बुल्स विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ८:३० वाजता).

१० जानेवारी २०२२ : तमिळ थलयवाज विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध दबंग दिल्ली (संध्याकाळी ८:३० वाजता).

११ जानेवारी २०२२ : पाटणा पायरेट्स वि यू मुंबा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि तेलुगु टायटन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१२ जानेवारी २०२२ : हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि दबंग दिल्ली विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१३ जानेवारी २०२२ : बंगाल वॉरियर्स विरुद्ध तामिळ थलायवाज (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण (संध्याकाळी ८:३० वाजता).

१४ जानेवारी २०२२ : जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पाटणा पायरेट्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि गुजरात जायंट्स विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१५ जानेवारी २०२२ : हरियाणा स्टीलर्स विरुद्ध दबंग दिल्ली (संध्याकाळी ७:३० वाजता), यूपी योद्धा विरुद्ध तेलुगू टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि यू मुंबा विरुद्ध बंगाल वॉरियर्स (रात्री ९:३० वाजता).

१६ जानेवारी २०२२ : तमिळ थलायवाज विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि पाटणा विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१७ जानेवारी २०२२ : पुणेरी पलटण विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि तेलुगु टायटन्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१८ जानेवारी २०२२ : दबंग दिल्ली विरुद्ध पाटणा पायरेट्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि गुजरात जायंट्स विरुद्ध यू मुंबा (संध्याकाळी ८:३० वाजता).

१९ जानेवारी २०२२ : हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पुणेरी पलटण (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध तेलुगू टायटन्स (रात्री ९:३० वाजता).

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० जानेवारी २०२२ : तमिळ थलयवाज विरुद्ध गुजरात जायंट्स (संध्याकाळी ७:३० वाजता).