प्रो कबड्डी लीगच्या ९व्या हंगामातील १२ व्या सामन्यात, हरियाणा स्टीलर्सने तमिळ थलायवासचा २७-२२ असा पराभव केला आणि सलग दुसरा विजय नोंदवला. दोन सामन्यांनंतर तामिळ थलायवासचा हा पहिला पराभव आहे. तमिळ थलायवासचा कर्णधार सागरने उच्चांकी ५ गुण मिळवत आघाडी घेतली पण त्याची कामगिरी व्यर्थ गेली.

पूर्वार्धानंतर हरियाणा स्टीलर्सने तामिळ थलायवाविरुद्ध १५-१० अशी आघाडी घेतली. एका वेळी तमिळ थलायवा ५-२ ने आघाडीवर होते आणि या वेळी हरियाणा स्टीलर्स लवकरच ऑलआऊट होईल असे वाटत होते. मात्र, आधी मीतूला चढाईत पॉइंट मिळाला आणि त्यानंतर मनजीतने आपल्या संघाला पहिला टॅकल पॉइंट मिळवून हरियाणाला दिलासा दिला. दोन्ही संघांनी खेळाचा वेग कमी करत वेळ काढण्याचा प्रयत्न केला. डू अँड डाय रेडवर खेळण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे दोन्ही संघांना फारशी आघाडी मिळाली नाही. चढाईपटूंनी भरपूर झुंज दिली आणि बचावपटूंनी वर्चस्व गाजवले. मनजीतने चढाईत गुणांचा दुष्काळ मोडून काढला आणि दोन चढाईत तीन टच पॉइंट मिळवत संघाला आघाडीवर नेले. याच कारणामुळे सामन्याच्या १९व्या मिनिटाला हरियाणा स्टीलर्सने पहिल्यांदाज तमिळ थलायवासला ऑलआऊट केले.

साहिल गुलियाने तमिळ थलायवाससाठी उत्तम खेळ करत त्याने तीन टॅकल पॉइंट मिळवले. हरियाणा स्टीलर्ससाठी, मनजीतने रेडिंगमध्ये ५ टॅकल आणि नितीन रावलने तीन टॅकल पॉइंट घेतले. सहाव्या मिनिटालाच हरियाणाने कर्णधार जोगिंदर नरवालला बाद केले हे विशेष.

तामिळ थलायवासने दुसऱ्या हाफची चांगली सुरुवात करत तीन गुण मिळवले, परंतु मीतूने त्याच्या चढाईत दोन गुणांसह हरियाणा स्टीलर्सची आघाडी वाढवली. करो या मरो स्थितीत त्याने त्याच्या चढाईत नरेंद्रलाही बाद केले. हरियाणाचा संघ पुन्हा एकदा ऑलआऊट होण्याच्या जवळ आला. थलायवासचे गुण आणि हरियाणाचे गुण जवळपास बरोबरीला आले होते, पण सागरने दोन संघांमधील अंतर कमी करण्यासाठी सुपर टॅकल केली. दरम्यान, कर्णधार सागर राठीनेही आपली ५ रेड पूर्ण केल्या होत्या. हरियाणाच्या बचावफळीने त्यांच्या संघाची आघाडी कमी होऊ दिली नाही, तर तामिळ थलायवासच्या बचावफळीने सुपर टॅकल करत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. स्टीलर्सच्या जयदीपनेही ५ रेड पूर्ण केल्या होत्या.

हेही वाचा :   जिद्दी शाहबाज! वडील इंजिनिअर व्हायला सांगत होते आणि तो झाला क्रिकेटर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामना खूपच रोमांचक झाला, परंतु हरियाणा स्टीलर्सला पूर्वार्धात मिळालेली आघाडी त्यांनी उत्तरार्धात मजबूत ठेवली. दुसरीकडे, तामिळ थलायवासला पीकेएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू पवन सेहरावतची उणीव भासली, जो त्यांच्या पराभवाचे कारणही ठरला. शेवटी स्टीलर्सने सामना जिंकला. तामिळ थलायवासला सामन्यात केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले.