प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यंदा या पर्वात ४ संघ नव्याने दाखल झालेले असून यामुळे स्पर्धेची व्याप्तीही वाढवण्यात आलेली आहे. यंदाच्या पर्वात ‘यूपी योद्धा’ संघाकडून खेळणारा नितीन तोमर हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. उत्तर प्रदेशने नितीन तोमरला तब्बल ९३ लाखांची बोली लावली. मात्र आजही या खेळाडूचे पाय जमिनीवर आहेत. सर्वात महागडा खेळाडू ठरला असूनही नितीन आजही शेतात तितक्याच मेहनतीने राबताना दिसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीन तोमर हा उत्तरप्रदेशच्या बगपत जिल्ह्याच्या मलकपूर गावाचा रहिवासी आहे. आपल्या लहानपणापासून कबड्डी खेळत असलेल्या नितीन नौदलात दाखल झाला. आजही सेनादलाच्या संघाकडून नितीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला आहे. मात्र नितीनचा परिवार आजही शेतामध्ये राबतो. मध्यंतरी माध्यमांनी नितीनला, प्रो-कबड्डीच्या लिलावात मिळालेल्या रकमेचं काय करणार असा प्रश्न विचारला होता, त्यावेळी नितीनने कोणताही विचार न करता, “बहिणीच्या लग्नासाठी थोडे पैसे ठेवीन आणि बाकीचे शेतीच्या कामासाठी वापरीन”, असं उत्तर दिलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi season 5 the most expensive player of up yodhas is still working with his grandmother in farm
First published on: 01-08-2017 at 15:52 IST