राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेवर पुण्याचे वर्चस्व

पुरुष प्रेसिडेंट चषक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये पुण्याचे वर्चस्व दिसून आले.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : श्रमिक जिमखाना येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरुष प्रेसिडेंट चषक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये पुण्याचे वर्चस्व दिसून आले. अन्य सामन्यांमध्ये ४९ किलो वजनी गटात नाशिकच्या गोपाळ खंदारेने लातूरच्या अरविंद सावंतचा तर नागपूरच्या अनिल तूरकरने मुंबईच्या राहुल भारद्वाजचा ३-० असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

५२ किलो वजनी गटात पुण्याच्या गौरव गोसावीने कोल्हापूरच्या अनिकेत पोवरचा तर अमरावतीच्या वैभव शिंदेने नागपूरच्या नितेश पटलेचा (३-०) पराभव केला व अंतिम फेरीत प्रवेश केला. ५६ किलो वजनी गटात मुंबईच्या बिरु बिंदने पुण्याच्या आशीष रसाळचा तर कोल्हापूरच्या शुभम पवारने अमरावतीच्या अजर अलीचा पराभव केला व अंतिम फेरीत प्रवेश केला. ६० किलो वजनी गटात पुण्याच्या आकाश मानेरेने नाशिकच्या श्रीहरी मोरेचा व अमरावतीच्या रितिक तिवारीने मुंबईच्या अमित मानेला (३-०) पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ६४ किलो वजनी गटात औरंगाबादच्या अमेय कांबळेने नागपूरच्या अजय जुगसणीयेचा व पुण्याच्या ऋषीकेश रणदिवेने अमरावतीच्या युनूस सय्यदचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ६९ किलो वजनी गटात पुण्याच्या केतन गायकवाडने कोल्हापूरच्या मयूर सांगळेवर विजय मिळवला व दुसऱ्या सामन्यात औरंगाबादचा कुणाल भांगे विजयी ठरला.

९१ किलो वजनी गटात पुण्याच्या सूरज विधातेने अमरावतीच्या समीर अहमदवर व औरंगाबादच्या शिव गाडेकरने मुंबईच्या सूरज यादव याचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune dominates in state level boxing