प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडू मनजीत चिल्लर आणि अजय ठाकूर यांच्यासह नऊ खेळाडूंचा तिसऱ्या हंगामासाठी पुणेरी पलटण संघात समावेश करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात प्रो कबड्डीचा तिसरा हंगाम रंगणार आहे.
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामात पुण्याच्या संघाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे तिसऱ्या हंगामासाठी पुणेरी पलटणने अन्य संघांतील महत्त्वाच्या खेळाडूंना स्थान दिले आहे. चिल्लर आणि ठाकूर यांच्यासह सोमवीर शेखर, संदीप मलिक अशा बंगळुरू बुल्सच्या चार खेळाडूंचा पुण्याच्या संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय तेलुगू टायटन्सचे दीपक हुडा व सचिन सिघाडे, जयपूर पिंक पँथर्सचा प्रशांत चव्हाण, बंगाल वॉरियर्सचा सचिन खांबे आणि दबंग दिल्लीचा जसमेर गुलिया यांचा पुण्याच्या संघात समावेश झाला आहे. तसेच रविंदर कुमार, रामकुमार आणि नीलेश साळुंखे या गुणी खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puneri paltan strong
First published on: 20-11-2015 at 00:57 IST