ऑलिम्पिकपटू एस. व्ही. सुनील याने केलेल्या दोन गोलांमुळेच पंजाब वॉरियर्सने उत्तर प्रदेश विझार्ड्सला ४-३ असे हरवत हॉकी इंडिया लीगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
पंजाबचे २० गुण झाले असून दिल्ली व्हेवरायडर्स (२७) व रांची ऱ्हिनोज (२२) हे अनुक्रमे पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. पंजाबकडून सुनील याने दोन गोल केले, तर जेमी डायर व ख्रिस्तोफर सिरिएलो यांनी प्रत्येकी एक गोल केला.