चुरशीने झालेल्या लढतीत पंजाब वॉरियर्सने बलाढय़ उत्तर प्रदेश विझार्ड्स संघाला २-२ असे बरोबरीत रोखले आणि हॉकी इंडिया लीगमध्ये आपले आव्हान राखले.
या लढतीत पंजाबच्या शिवेंद्रसिंग याने १२ व्या मिनिटाला गोल करीत संघाचे खाते उघडले. मात्र २४ व्या मिनिटाला उत्तर प्रदेशने गोल करीत बरोबरी साधली. त्यांचा हा गोल कर्णधार व्ही.आर.रघुनाथ याने पेनल्टी कॉर्नरद्वारा केला. २८ व्या मिनिटाला पंजाबच्या खेळाडूंनी जोरदार चाल केली. त्यांच्या मलाकसिंग याने उत्तर प्रदेशच्या बचावरक्षकांना चकवित अप्रतिम गोल केला आणि संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. अर्थात त्यांची ही आघाडी अल्पकाळ ठरली. ३५ व्या मिनिटाला उत्तर प्रदेशला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत रघुनाथ यानेच पुन्हा गोल केला आणि २-२ अशी बरोबरी केली.