भारताची वेटलिफ्टिंगपटू राखी हॅल्डरने कतार आंतरराष्ट्रीय चषक वेटलिफ्टिंग स्पर्धेतील महिलांच्या ६४ किलो गटात कांस्यपदक मिळवताना दोन राष्ट्रीय विक्रम नोंदवले.

राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या राखीने राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील स्नॅच आणि एकूण वजन उचलण्याचे दोन विक्रम मोडीत काढले. तिने एकूण २१८ किलो (९५ किलो स्नॅच + १२३ किलो क्लीन अँड जर्क) वजन उचलले.

भारताने या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत एकूण तीन पदकांची कमाई केली. माजी विश्वविजेत्या मिराबाई चानूने सुवर्णपदक मिळवले, तर जेरेमी लालरिनुंगाने रौप्यपदक पटकावले. २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने या स्पर्धेतील गुण महत्त्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.