कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक २०२२ या स्पर्धेला २० नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेसाठी अनेक वर्षांपासून तयारी सुरू होती. हजारो स्थलांतरित मजुरांना $200 अब्ज पेक्षा जास्त किमतीचे स्टेडियम, मेट्रो लाईन आणि स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या नवीन पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी कामावर घेण्यात आले. दरम्यान कामाच्या तयारीत शेकडो मजुरांचा मृत्यू झाल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. यावर आता फिफा विश्वचषकाच्या आयोजनाशी संबंधित कतारचे उच्चपदस्थ अधिकारी हसन अल-थवाडी यांनी हा खुलासा केला आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये, विश्वचषकाच्या तयारीदरम्यान मृत्यू झालेल्यांची संख्या हजारोंच्या संख्येने सांगण्यात आली आहे. या अहवालांनंतर मानवाधिकारांनी कतारवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर कतारवरही जगभरातून टीका होत आहे. त्यामुळे फिफा विश्वचषक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मात्र आता एक नवा खुलासा समोर आला आहे. फिफा विश्वचषक २०२२ च्या तयारीमुळे किती मजुरांना आपले प्राण गमवावे लागले याची अंदाजे आकडेवारी मिळाली आहे. फिफा विश्वचषकाच्या आयोजनाशी संबंधित कतारचे उच्चपदस्थ अधिकारी हसन अल-थवाडी यांनी हा खुलासा केला आहे.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

हसन हे ‘डिलिव्हरी आणि लेगसी’ या कतारच्या सर्वोच्च समितीचे महासचिव आहेत. त्यांनी ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तयारीमध्ये ४०० ते ५०० लोक मरण पावले. पियर्सने या मुलाखतीची एक क्लिपही सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याचवेळी सर्वोच्च समिती आणि कतार सरकारने याप्रकरणी मौन बाळगले आहे.

कतारच्या अधिकाऱ्याने काय खुलासा केला?

ब्रिटीश पत्रकार मॉर्गनला दिलेल्या मुलाखतीत हसनला विचारण्यात आले की, ‘विश्वचषक स्पर्धेसाठी काम केल्यामुळे स्थलांतरित कामगारांच्या मृत्यूची प्रामाणिक, वास्तववादी आकडेवारी काय आहे?’ उत्तरात हसन म्हणाला, ”अंदाजे ४०० च्या आसपास आहे, ४०० ते ५०० च्या दरम्यान. माझ्याकडे अचूक आकडे नाहीत. पण या आकड्याची आधी सार्वजनिक चर्चा झाली नव्हती.”

होस्टिंग मिळाल्यापासून २०२१ पर्यंत ६५०० लोकांचा मृत्यू –

कतार सरकारच्या मते, २०१० ते २०१९ दरम्यान देशात एकूण १५०२१ प्रवासी मरण पावले. गार्डियनच्या अहवालात असे म्हटले आहे की कतारला फिफा विश्वचषकाचे यजमानपद मिळाल्यापासून २०२१ पर्यंत तेथे ६५०० हून अधिक प्रवासी कामगार मरण पावले आहेत. हे सर्वजण भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील रहिवासी होते. दरम्यान, सरकारने स्थान, काम किंवा इतर घटकांनुसार मृत्यूचे विभाजन केले नाही.

हेही वाचा – विश्लेषण: कतार ठरले ९२ वर्षांतील सर्वांत सुमार विश्वचषक यजमान! कशी होती आजवरच्या यजमानांची मैदानावरील कामगिरी?

फिफा विश्वचषक स्टेडियम तयार करण्यासाठी ३०,००० परदेशी मजुरांना काम देण्यात आल्याचेही कतार सरकारने सांगितले आहे. या सर्व व्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला (ILO) २०२० मध्ये कामाच्या दरम्यान ५० लोकांचा मृत्यू झाल्याचे आढळले. 500 गंभीर जखमी झाले आणि ३७६०० लोकांना सौम्य ते मध्यम जखमा झाल्या.