मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दोन्ही डावात अश्विननं भेदक मारा केला. अश्विनच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १९५ तर दुसऱ्या डावात २०० धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय संघाला विजयासाठी फक्त ७० धावांचं आवाहन देण्यात आलं आहे.

आणखी वाचा- ३१ वर्षांनंतर भारतीय गोलंदाजांसमोर कांगारुंनी नांगी टाकली; भारताने केली या संघाच्या विक्रमाशी बरोबर

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात अश्विननं श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथया मुरलीधनचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील दोन्ही डावात अश्विननं पाच विकेट घेतल्या आहेत. यासह अश्विन डाव्या हाताच्या फलंदाजाला बाद करणाऱ्या गोलंदाजामध्ये पहिल्या स्थानावर पोहचला आहे. याआधी हा विक्रम मुरलीधरनच्या नावावर होता.

आणखी वाचा- आभाळाएवढं दुःख विसरुन तो लढला आणि यशस्वीही झाला, बॉक्सिंग डे कसोटीवर सिराजची छाप

मेलबर्नमध्ये घेतलेल्या पाच विकेटमुळे अश्विनच्या नावावर ३७५ कसोटी बळी झाले आहे. यामद्ये १९२ डाव्या हाताच्या फलंदाजाला बाद केलं आहे. मुरलीधरनने ८०० कसोटी विकेटमध्ये १९१ डाव्या हाताच्या फलंदाजाला बाद केलं आहे. मेलबर्न कसोटी सामन्यात स्टार्कला बाद करत अश्विननं मुरलीधनचा हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. डाव्या हाताच्या फलंदाजाला बाद करणाऱ्या गोलंदाजात तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जेम्स अँडरसन आहे. तर चौथ्या स्थानावर ग्लेन मॅक्ग्रा, पाचव्या कर्मांकावर शेन वॉर्न आणि सहाव्या स्थानावर अनिल कुंबळे आहे.