एमएसएलटीए चॅलेंजर टेनिस स्पर्धा
भारताच्या पूरव राजा आणि रामकुमार रामनाथन जोडीने अर्जुन खाडे आणि साकेत मायनेनी जोडीला सरळ सेटमध्ये पराभूत करून एमएसएलटीए चॅलेंजर टेनिस स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी दुहेरीचे जेतेपद पटकावले.
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथील टेनिस संकुल येथे झालेल्या या स्पर्धेत राजा-रामनाथन जोडीने अर्जुन-साकेत जोडीला ७-६ (३), ६-३ असे नामोहरम केले आणि ८० एटीपी गुणांची कमाई केली. अर्जुन-साकेत जोडीला ४८ एटीपी गुण मिळाले.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
पुरुष एकेरीत ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थने जे क्लार्कचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत ४-६, ६-४, ६-४ असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना दोन तास आणि १८ मिनिटे चालला. डकवर्थने ८० एटीपी गुण प्राप्त केले.