राजस्थानचा १९ वर्षांखालील खेळाडू आदित्य गरवालने विक्रमी १८ षटकार आणि २२ चौकारांसह १५१ चेंडूंत नाबाद २६३ धावांची खेळी साकारली. विनू मंकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतील मध्य विभागाच्या सामन्यात रेल्वेविरुद्ध त्याने ही खेळी साकारली.विद्यापीठ क्रीडांगणावरील या सामन्यात राजस्थानने ५० षटकांत ३ बाद ४१३ धावा केल्या. एन. एन. सिंगने ९४ धावा केल्या. सिंग आणि गरवाल यांनी तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी २६१ धावांची भागीदारी रचली. प्रत्युत्तरादाखल रेल्वेचा संघ ४२.२ षटकांत १४७ धावांत गडगडला. यात मोहित पालच्या सर्वाधिक ४२ धावांचा समावेश आहे. शुभम शर्माने ४२ धावांत पाच बळी घेतले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Oct 2014 रोजी प्रकाशित
राजस्थानच्या आदित्य गरवालचा १८ षटकारांचा विक्रम
राजस्थानचा १९ वर्षांखालील खेळाडू आदित्य गरवालने विक्रमी १८ षटकार आणि २२ चौकारांसह १५१ चेंडूंत नाबाद २६३ धावांची खेळी साकारली.
First published on: 22-10-2014 at 12:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan u 19 player slams record 18 sixes in double ton