आगामी न्यूझीलंड दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर वेस्ट इंडिजच्या कसोटी कर्णधारपदावरून अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमीला डच्चू देण्यात आला असून त्याच्या जागी दिनेश रामदिनकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ‘त्रिनिदाद गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार सध्या सॅमी आयपीएल स्पध्रेत सनरायजर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करीत आहे. मात्र यष्टीरक्षक-फलंदाज रामदिनने निवड समितीचे लक्ष वेधले आहे.
वेस्ट इंडिजच्या निवड समितीचे अध्यक्ष क्लाइड बट यांनी रामदिनला बोलावून कर्णधारपदाविषयी विचारणा केल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, सॅमीकडून कसोटी कर्णधारपद काढून घेण्यात आल्याने वेस्ट इंडिजसाठी कसोटी (दिनेश रामदिन), एकदिवसीय (ड्वेन ब्राव्हो) आणि ट्वेन्टी (डॅरेन सॅमी) असे तीन स्वतंत्र कर्णधार असणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 10th May 2014 रोजी प्रकाशित
वेस्ट इंडिजच्या कसोटी कर्णधारपदावरून डॅरेन सॅमीला डच्चू, रामदिनची निवड
आगामी न्यूझीलंड दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर वेस्ट इंडिजच्या कसोटी कर्णधारपदावरून अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमीला डच्चू देण्यात आला असून त्याच्या जागी दिनेश रामदिनकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

First published on: 10-05-2014 at 12:11 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdin to replace sammy as windies test captain