वृत्तसंस्था, मुंबई

तनुष कोटियन आणि शार्दूल ठाकूर यांची अष्टपैलू कामगिरी, तसेच डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने दुसऱ्या डावात केलेल्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर मुंबईने उपांत्य फेरीत तमिळनाडूचा तीन दिवसांतच एक डाव आणि ७० धावांनी धुव्वा उडवत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 SRH vs CSK Highlights: चेन्नईचा सलग दुसरा पराभव, हैदराबादने ६ विकेट्सने सहज जिंकला सामना
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!
Heinrich Klaassen who scored an unbeaten 80 runs against MI
IPL 2024 : हेनरिचला ‘क्लास’ खेळीसाठी सनरायझर्स हैदराबादकडून मिळाले खास ‘गिफ्ट’, PHOTO होतोय व्हायरल
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 : ‘रन’ धुमाळीत हैदराबादची सरशी, मुंबई इंडियन्सवर ३१ धावांनी विजय

वांद्रे कुर्ला संकुल येथील ‘एमसीए’ अकादमीच्या मैदानावर झालेल्या उपांत्य सामन्यात मुंबईने पहिल्या डावात ३७८ धावांची मजल मारताना २३२ धावांची आघाडी मिळवली होती. याच्या प्रत्युत्तरात तमिळनाडूच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही मुंबईच्या गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली. तमिळनाडूचा दुसरा डाव १६२ धावांतच संपुष्टात आला. त्यामुळे मुंबईने मोठय़ा विजयासह ४८व्यांदा रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली.

शार्दूल ठाकूर आणि तनुष कोटियन हे मुंबईच्या या शानदार विजयाचे शिल्पकार ठरले. पहिल्या डावात मुंबईचा संघ अडचणीत असताना शार्दूलने १०५ चेंडूंत १०९ धावांची अप्रतिम खेळी साकारली. तसेच उपांत्यपूर्व सामन्यात बडोदाविरुद्ध १०व्या क्रमांकावर येत शतक साकारणाऱ्या कोटियनने आपली लय कायम राखताना तमिळनाडूविरुद्ध १२६ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने नाबाद ८९ धावा केल्या. त्याला ११व्या क्रमांकावरील तुषार देशपांडेने (६० चेंडूंत २६) सुरेख साथ दिली. त्यामुळेच मुंबईला पहिल्या डावात द्विशतकी आघाडी घेता आली. अखेरच्या दोन जोडय़ांनी मिळून मुंबईच्या धावसंख्येत १६७ धावांची भर घातली.  

हेही वाचा >>>IPL 2024: पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचा नवा कर्णधार

त्यानंतर मोठय़ा फरकाने पिछाडीवर असलेल्या तमिळनाडूला फलंदाजांकडून दमदार कामगिरीची गरज होती. मात्र संपूर्ण हंगामात चमकदार कामगिरी केलेल्या या फलंदाजांचा मुंबईच्या गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. फलंदाजीतील महत्त्वपूर्ण योगदानानंतर शार्दूल आणि कोटियन यांनी गोलंदाजीत दुसऱ्या डावात प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर अनुभवी फिरकीपटू मुलानीने ५३ धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक चार बळी मिळवले.

दुसऱ्या डावात तमिळनाडूची सुरुवातच निराशाजनक झाली. शार्दूलने तमिळनाडूचे सलामीवीर एन. जगदीशन (०) आणि साई सुदर्शन (५) यांना झटपट माघारी धाडले. तर तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदरचा (४) अडसर मोहित अवस्थीने दूर केला. त्यामुळे तमिळनाडूची ३ बाद १० अशी स्थिती झाली. बाबा इंद्रजित (१०५ चेंडूंत ७०) आणि प्रदोष रंजन पॉल (५४ चेंडूंत २५) यांनी ७३ धावांची भागीदारी रचताना तमिळनाडूचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऑफ-स्पिनर कोटियनने प्रदोषला बाद करत तमिळनाडूला चौथा धक्का दिला. काही काळाने अवस्थीने इंद्रजितला माघारी धाडले. यानंतर कोटियन आणि मुलानी यांनी प्रभावी फिरकी गोलंदाजी करताना तमिळनाडूचा डाव गुंडाळला. तमिळनाडूने अखेरचे पाच गडी नऊ धावांतच गमावले.

हेही वाचा >>>Ranji Trophy 2024: शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई अंतिम फेरीत; तामिळनाडूवर डावानं विजय

अंतिम सामना वानखेडेवर

मुंबई आणि तमिळनाडू यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना वांद्रे कुर्ला संकुल येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झाल्याने मुंबईकर क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला. मात्र, आता रणजी करंडकाच्या अंतिम सामन्याचे महत्त्व लक्षात घेता हा सामना ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) सचिव अजिंक्य नाईक यांनी सोमवारी सांगितले. हा सामना १० ते १४ मार्च या कालावधीत खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्यात मुंबईसमोर विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल.

संक्षिप्त धावफलक

’ तमिळनाडू (पहिला डाव) : १४६

’ मुंबई (पहिला डाव) : १०६.५ षटकांत सर्व बाद ३७८ (शार्दूल ठाकूर १०९, तनुष कोटियन नाबाद ८९, मुशीर खान ५५, हार्दिक तामोरे ३५; साई किशोर ६/९९, कुलदीप सेन २/७५

’ तमिळनाडू (दुसरा डाव) : ५१.५ षटकांत सर्व बाद १६२ (बाबा इंद्रजित ७०, प्रदोष पॉल २५, विजय शंकर २४; शम्स मुलानी ४/५३, शार्दूल ठाकूर २/१६, तनुष कोटियन २/१८, मोहित अवस्थी २/२६)

सामनावीर : शार्दूल ठाकूर