वृत्तसंस्था, नागपूर

यजमान विदर्भाच्या संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध आपली बाजू भक्कम केली असली, तरी हा सामना उत्कंठावर्धक वळणावर आहे. आज, बुधवारी या सामन्याचा अखेरचा दिवस असून विजय मिळवण्यासाठी विदर्भाला आणखी चार बळींची, तर मध्य प्रदेशला ९३ धावांची आवश्यकता आहे.

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Shanshak Singh Performance in IPL 2024
IPL 2024 मध्ये ‘या’ खेळाडूने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना फोडलाय घाम, ५ डावात फक्त एकदाच झालाय आऊट

नागपूर येथे सुरू असलेल्या या सामन्यात विदर्भाने विजयासाठी मध्य प्रदेशसमोर ३२१ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना मंगळवारी, सामन्याच्या चौथ्या दिवसअखेरीस मध्य प्रदेशची ६ बाद २२८ अशी धावसंख्या होती. खेळ थांबला तेव्हा सारांश जैन १६, तर कुमार कार्तिकेय शून्यावर खेळत होता. मध्य प्रदेशचा पहिला डाव लांबविण्यात सारांशची ३० धावांची खेळी निर्णायक ठरली होती. त्यामुळे आता विजयासाठी मध्य प्रदेशच्या सर्व आशा सारांशवर अवलंबून असतील.

हेही वाचा >>>Ranji Trophy 2024: ‘टॉस जिंकून बॅटिंग घेतली तिथेच मॅच हरलो’; तामिळनाडूचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णींच्या वक्तव्यावरुन वाद

त्रिशतकी आव्हानाचा पाठलाग करताना मध्य प्रदेशसाठी सलामीवीर यश दुबेने अप्रतिम फलंदाजी केली. दुसऱ्या बाजूने फलंदाज बाद होत असताना यश खेळपट्टीवर टिच्चून उभा होता. कमालीच्या संयमाने खेळताना यशने २१२ चेंडूंत १० चौकारांसह ९४ धावांची खेळी केली. शतकासाठी सहा धावा दूर असताना त्याला डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने माघारी धाडले. तो बाद झाला, तेव्हा दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी केवळ एक षटक शिल्लक होते. येथेच विदर्भाने आपली बाजू भक्कम केली. यशला हर्ष गवळीची साथ मिळाली. हर्षने ८० चेंडूंत ११ चौकारासंह ६७ धावांची खेळी करताना यशच्या साथीत १०६ धावांची भागीदारी केली.

पहिल्या डावातील शतकवीर हिमांशू मंत्री (८), तसेच मधल्या फळीतील सागर सोळंकी (१२), शुभम शर्मा (६) आणि वेंकटेश अय्यर (१९) यांना फारसे योगदान देता न आल्याने मध्य प्रदेशवरील दडपण वाढले. या तिघांनाही ऑफ-स्पिनर अक्षय वखरेने बाद केले. अखेरच्या दिवशीही विदर्भाच्या आशा वखरे-सरवटे या अनुभवी फिरकी जोडीवरच अवलंबून असतील.

हेही वाचा >>>Ind vs Eng: यशस्वी जैस्वालला ICC च्या खास पुरस्काराचे मानांकन

त्यापूर्वी, चौथ्या दिवशी ६ बाद ३४३ अशा धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केलेल्या विदर्भाचा दुसरा डाव ४०२ धावांवर संपुष्टात आला. तिसऱ्या दिवसअखेरचा नाबाद फलंदाज यश राठोडने २०० चेंडूंत १८ चौकार आणि दोन षटकारांसह १४१ धावांची सुरेख खेळी केली. अखेरच्या टप्प्यात डावखुऱ्या यशने दाखवलेली आक्रमकता विदर्भाचे आव्हान भक्कम करणारी ठरली. त्याने चौथ्या दिवशी तळाच्या चार फलंदाजांना हाताशी घेत विदर्भाच्या धावसंख्येत ५९ धावांची भर घातली.

संक्षिप्त धावफलक

’ विदर्भ (पहिला डाव) : १७०

’ मध्य प्रदेश (पहिला डाव) : २५२

’ विदर्भ (दुसरा डाव) : १०१.३ षटकांत सर्वबाद ४०२ (यश राठोड १४१, अक्षय वाडकर ७७,

अमन मोखाडे ५९, अनुभव अगरवाल ५/९२)  

’ मध्य प्रदेश (दुसरा डाव) : ७१ षटकांत ६ बाद २२८ (यश दुबे ९४, हर्ष गवळी ६७; अक्षय वखरे ३/३८, आदित्य सरवटे २/५१)