शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये शरीर फक्त बलवान असणे गरजेचे नाही, तर शरीराची ठेवणही महत्त्वाची असते, हेच कनिष्ठ ‘कनिष्ठ महाराष्ट्र-श्री’ स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. पुण्याचा सचिन खांबे शरीरयष्टीने बलवान होता, त्याच्यासारख्या रेखीव मांडय़ा स्पर्धेत कोणाच्याही नव्हत्या. पण एकंदर शरीरसंपदेत तो कमी पडला आणि कोल्हापूरचा रसलान नायकवाडी आपल्या शरीरयष्टीच्या जोरावर ‘कनिष्ठ महाराष्ट्र-श्री’चा मानकरी ठरला. महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने शिवाजी मंदिरात रंगलेल्या कनिष्ठ, अपंग आणि मास्टर्स गटाच्या स्पर्धा रंगल्या.  अपंग स्पर्धेत ठाण्याच्या योगेश मेहेरने तर मास्टर्स स्पर्धेमध्ये ठाण्याच्याच रियाज शेखने विजेतेपद पटकावले.

‘कनिष्ठ महाराष्ट्र-श्री’ स्पर्धेचा निकाल
५५ किलो : १. विशाल म्हात्रे (मुंबई), २. वैभव गुरव (मुंबई), ३. वैभव शेळके (नाशिक).
 ६० किलो : १. प्रकाश बावडणे (मुंबई), २. समीर म्हात्रे (मुंबई), ३. ज्ञानेश्वर म्हस्के (नाशिक).
६५ किलो : १. जयेश मकर (पुणे),२. प्रसाद मोरे (मुंबई), ३. हितेश येवले (मुंबई).
७० किलो : १. सुशांत म्हात्रे (उपनगर), २. साजिद कुरेशी (सातारा), ३. किशोर क्षीरसागर (पुणे).
७५ किलो : १. सचिन खांबे (पुणे), २. मनोहर पाटील (मुंबई), ३. अभिजीत पाडले (सातारा).
७५ किलो : १. रसलान नायकवडी (सोलापूर), २. मयूर घरत (मुंबई), ३. शेखर कामे (सांगली).

‘अपंग महाराष्ट्र-श्री’ स्पर्धेचा निकाल
६५ किलो : १. योगेश मेहेरे (ठाणे), २.अलप्पा मिलंगे (मुंबई), ३. विजय गोरिवले (मुंबई).
६५ किलो : १. दिलीप मारू (मुंबई), २. मेहबूब शेख (मुंबई), ३. शिवकुमार आडे (पुणे).

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मास्टर्स महाराष्ट्र-श्री’ स्पर्धेचा निकाल
४० ते ५० वर्षे : १. रियाज शेख (ठाणे), २. संतोष भिवंदे (मुंबई), ३. संतोष ठोंबरे (मुंबई).
५० ते ६० वर्षे : १. विवेक बागवाडी (कोल्हापूर), २. कुमार चेवले (रायगड), ३.पी. ए. अ‍ॅन्थनी (नवी मुंबई)
६० किलो वर्षांवरील : १. ज्ञानदेव पाष्टे (मुंबई), २. प्रकाश मिर्लेकर (ठाणे).