अपोलो जिम आणि जयभारत व्यायामशाळा यांच्यातर्फे आयेाजित केलेल्या दिलीप पाटील स्मृतिचषक राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पध्रेत आरसीएफने ठाणे पोलिसांवर धक्कादायक विजय मिळवला. याचप्रमाणे देना बँक आणि सेंट्रल बँकेने सहज विजयाची नोंद केली.
खारीगावच्या मफतलाल मिनी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पध्रेत पोलिसांनी आक्रमक खेळासह निकाल पालटण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु सागर पाटील व संदेश बैकरच्या चढायांच्या बळावर आरसीएफने हा सामना ३३-३० असा जिंकला. पोलिसांकडून निशिकांत पाटील आणि हरीश तावडेने चढायांचा तर अजिंक्य यादवने पकडींचा दमदार खेळ केला.
देना बँकेने योगेश सावंत व नितेश मोरेच्या चढायांच्या बळावर जतीनकुमार कंपनीचा २५-१८ असा पराभव केला. पराभूत संघाकडून मयुर खामकर, सौरभ आमटे छान खेळले. सेंट्रल बँकेने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा ५६-२३ असा फडशा पाडला. सेंट्रल बँकेच्या सुमीत पाटील व अजय दुदले यांनी दमदार चढाया केल्या, तर पालिकेकडून अमित भगत चमकला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2015 रोजी प्रकाशित
आरसीएफची ठाणे पोलिसांवर मात
अपोलो जिम आणि जयभारत व्यायामशाळा यांच्यातर्फे आयेाजित केलेल्या दिलीप पाटील स्मृतिचषक राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पध्रेत आरसीएफने ठाणे पोलिसांवर धक्कादायक विजय मिळवला.
First published on: 25-01-2015 at 06:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcf deatd thane police kabaddi competition