रिअल माद्रिद संघाने एल्चेवर २-० असा विजय नोंदवीत ला लिगा फुटबॉल स्पर्धेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. माद्रिद सध्या बार्सिलोनापेक्षा चार गुणांनी पुढे आहे. एल्चेविरुद्ध झालेल्या या सामन्यात रिअल संघाने सुरुवातीपासून वर्चस्व गाजविले; पण खाते उघडण्यास त्यांना उत्तरार्धापर्यंत थांबावे लागले. उत्तरार्धात ११ व्या मिनिटाला त्यांच्या करीम बेझेंमा याने सुरेख गोल करीत संघाचे खाते उघडले. २१ व्या मिनिटाला क्रिस्तियानो रोनाल्डोने इस्को याने दिलेल्या पासवर संघाचा दुसरा गोल नोंदविला. रिअल संघाने २-० हीच आघाडी कायम ठेवत विजय मिळविला. माद्रिद संघाचा कर्णधार इकेर कॅसिलासने या स्पर्धेतील पाचशेवा सामना खेळण्याची अनोखी कामगिरी केली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2015 रोजी प्रकाशित
ला लिगा फुटबॉल स्पर्धा : रिअल माद्रिद अव्वल
रिअल माद्रिद संघाने एल्चेवर २-० असा विजय नोंदवीत ला लिगा फुटबॉल स्पर्धेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
First published on: 24-02-2015 at 12:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real madrid move four points clear on top