Ricky Ponting getting angry after England fans threw grapes on him Video went viral: ॲशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगसोबत गैरवर्तन केले. यामुळे पाँटिंग चांगलाच संतापलेला दिसत होता. लंडनमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्यात रिकी पाँटिंग पहिल्या दिवसाच्या खेळावर प्रतिक्रिया देत होता आणि सीमारेषेजवळ माईक घेऊन मैदानावर उभा होता. दरम्यान, स्टँडवर उपस्थित काही प्रेक्षकांनी त्याच्यावर द्राक्षे फेकली.

इंग्लंडच्या चाहत्यांनी रिकी पाँटिंगवर फेकली द्राक्षे –

ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पाँटिंग मैदानावर उभा राहून थेट कॉमेंट्री करत होता. त्याचवेळी, वरील स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी त्याच्यावर द्राक्षे फेकली. पाँटिंगला ही कृती अजिबात आवडली नाही. कार्यक्रमाच्या सूत्रधारांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला, पण पाँटिंग शांत होण्यास तयार नव्हता. लाइव्ह कॉमेंट्रीमध्ये तो म्हणाला, ‘काही लोकांनी माझ्यावर द्राक्षे फेकली. हे लोक कोण आहेत हे शोधण्यात मला काहीच अडचण नाही.’

चाहत्यांमध्ये सुरू झाले युद्ध –

इंग्लंडच्या चाहत्यांची ही कृती ऑस्ट्रेलियन चाहत्यांना आवडली नाही आणि सोशल मीडियावर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. दोघांनी एकमेकांना ट्रोल करायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी इंग्लंडच्या बार्मी आर्मीला खिलाडूवृत्तीची आठवण करून दिली. तो म्हणाले की, इंग्लंडच्या चाहत्यांनी ट्रॉफी गमावल्यानंतर किमान खिलाडूवृत्ती दाखवायला हवी.

हेही वाचा – MLC 2023: अरे हे क्रिकेट आहे की फुटबॉल? बॉलरने पायाने केलं रन आउट; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालिकेत ऑस्ट्रेलियाचा राहिला वरचष्मा –

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने इंग्लंडला ४ बाद २८३ धावांवर गुंडाळल्यानंतर पाचव्या आणि शेवटच्या ॲशेस क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी, ऑस्ट्रेलियाने गुरुवारी पहिल्या डावात १ बाद ६१ अशी आघाडी कायम ठेवली. ऑस्ट्रेलियाने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची एकमेव विकेट गमावली, तो ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर जॅक क्रॉलीच्या हाती झेलबाद झाला. त्याने २४ धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर उस्मान ख्वाजा २६ धावा आणि मार्नस लाबुशेनन दोन धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या पहिल्या डावात २२२ धावांनी पिछाडीवर असून नऊ विकेट्स शिल्लक आहेत.