रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक वॉल्टची अंतिम फेरी गाठत भारताच्या दीपा कर्माकरने भारतीयांच्या माना उंचावल्या असून आता स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पार पडणा-या अंतिम फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दीपाच्या कारगिरीबाबत तिच्यावर चहुबाजूंनी शुभेच्छांचा वर्षात होत आहे. आजघडीला ती प्रत्येक भारतीयाच्या गळ्यातील ताईत झाली असून सर्वांच्या तोंडी तिचेच नाव आहे. मात्र, ऑलिम्पिकचा सदिच्छादूत असलेल्या सलमान खानला आपल्या या स्टार खेळाडूचे नावही नीट माहित नसल्याचे एका व्हिडिओद्वारे समोर आले आहे. एका चित्रपटाच्या प्रसिध्दीच्या कार्यक्रमात सलमानने दीपा कर्माकरचे नाव दीपिका असे उच्चारले. एवढेच नव्हे तर तो चुकल्याचे सांगत, प्रेक्षकांमध्ये उपस्थित एकाने तिचे नाव दीपिका नाही तर दिप्ती असल्याचे सांगून गोंधळात आणखीनच भर घातल्य़ाचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व रिओ २०१६ ऑलिम्पिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika dipti or dipa salman get confused
First published on: 08-08-2016 at 13:45 IST