23 February 2019

News Flash

मो फराहचे विक्रमी जेतेपद!

१० हजार मीटरपाठोपाठ ५ हजार मीटर शर्यतीचे सुवर्ण

१० हजार मीटरपाठोपाठ ५ हजार मीटर शर्यतीचे सुवर्ण

मायकेल फेल्प्स, उसेन बोल्ट यांच्या अविस्मरणीय ऑलिम्पिक निवृत्तीनंतर सर्वाचे लक्ष लागून राहिलेल्या मो फराहने लांब पल्ल्याच्या शर्यतीत स्वत:चा दबदबा पुन्हा सिद्ध केला. ग्रेट ब्रिटनच्या फराहने रविवारी ५००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावून ऑलिम्पिक स्पध्रेत इतिहासाची नोंद केली. आठवडय़ापूर्वी त्याने १० हजार मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले होते. १९७६ सालानंतर सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये ५००० व १०००० मीटर शर्यतीचे जेतेपद पटकावणाऱ्या पहिल्या धावपटूचा मान त्याने मिळवला.

३३ वर्षीय फराहने कौशल्यपूर्ण कामगिरी करताना १३ मिनिटे ३.३० सेकंदांत शर्यत पूर्ण करून अव्वल स्थान पटकावले. ‘‘स्वप्न सत्यात उतरतात आणि माझ्या मुलांसाठी मला हा विक्रम करायचाच होता. गेली अनेक वष्रे मी त्यांना पाहिलेही नाही. आता मला घरी जायचे आहे आणि माझ्या लहान मुलांना कवटाळायचे आहे. त्यांच्या गळ्यात ही पदकं घालायची आहेत,’’ असे फराह म्हणाला. अमेरिकेच्या पॉल किप्केमोई चेलीमोने १३ मिनिटे ३.९० सेकंदांसह रौप्यपदक, तर इथोपियाच्या हॅगोस गेब्रहीवेटने १३ मिनिटे ४.३५ सेकंदासह कांस्यपदक जिंकले.

मला विश्वासच बसत नाही, की मी विक्रम केला आहे. १० हजार मीटर शर्यतीनंतर माझे पाय प्रचंड दुखत होते आणि सहकाऱ्यांनी माझ्यासाठी खोलीत जेवण आणून दिले. चार विजयांपैकी आजचा विजय खूप समाधान देणारा आहे. हे जेतेपद अविश्वसनीय आहे.

मो फराह

 

सेंट्रोवित्जची ऐतिहासिक कामगिरी

पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीत अमेरिकेच्या मॅथ्यू सेंट्रोवित्जने ३ मिनिटे ५० सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदकाची कमाई केली. जवळपास शंभर वर्षांनंतर अमेरिकेच्या धावपटूने या क्रीडा प्रकारात पदक पटकावले. १९०८च्या लंडन ऑलिम्पिक स्पध्रेत मेल शेपर्ड यांनी १५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.

‘‘या सारखा विजय असूच शकत नाही. या विजयाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही,’’ असे सेंट्रोवित्ज म्हणाला. अल्जेरियाच्या तौफिक मखलूफीने ३: ५०.११ सेकंदांसह रौप्य, तर न्यूझीलंडच्या निकोलस विलिसने ३: ५०.२४ सेकंदांसह कांस्यपदक जिंकले. सेंट्रोवित्जने २०१३च्या विश्व अजिंक्यपद स्पध्रेत रौप्यपदकाची कमाई केली होती, तर लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

 

कॅस्टरचे पहिलेवहिले सुवर्ण

दक्षिण आफ्रिकेच्या कॅस्टर सेमेन्याने महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत बाजी मारून पहिल्यावहिल्या ऑलिम्पिक सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.

 

तिने १ मिनिट ५५.२८ सेकंदाची

वेळ नोंदवली. ‘‘हे पदक संघाला समर्पण करते. त्यांनी चोख कामगिरी बजावली.  हा आनंद शब्दात मांडणे कठीण आहे,’’ असे मत कॅस्टरने व्यक्त केले. बुरुंडीच्या फ्रान्सिन नियोंसाबाने (१:५६.४९) रौप्य, तर केनियाच्या निआइरेरा मार्गारेट वाम्बुईनने (१:५६.८९) कांस्यपदक जिंकले.

१९७६ : फिनलँडच्या लॅस्से व्हिरेन यांनी १९७६च्या मॉट्रिअल ऑलिम्पिक स्पध्रेत  ५ हजार व १० हजार मीटर शर्यतीचे जेतेपद  राखण्यात यश मिळवले होते.

 

४ बाय ४०० मी. रिले शर्यतीत अमेरिकेचे वर्चस्व

अमेरिकेच्या पुरुष व महिला संघाने ४ बाय ४०० मी. रिले शर्यतीत वर्चस्व प्रस्थापित केले. कर्टनी ओकोलो, नताशा हॅस्टिंग्स्, फिलिस फ्रान्सिस व अ‍ॅलिसन फेलिक्स यांचा समावेश असलेल्या महिला संघाने ३ मिनिटे १९.०६ सेकंदांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. फेलिक्सचे हे ऑलिम्पिकमधील विक्रमी सहावे सुवर्णपदक आहे. जमैकाच्या संघाला (३:२०.३४) रौप्य, तर ग्रेट ब्रिटनला (३:२५.८८) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष गटात अरमान हॅल, टोनी मॅक् काय, गील रॉबर्ट आणि लॅशॉन मेरीट्टी यांनी २ मिनिटे ५७.३० सेकंदांची वेळ नोंदवून अमेरिकेच्या खात्यात सुवर्णपदकाची भर टाकली. जमैका (२:५८.१६) आणि बहामास (२:५८.४९) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

 

कॅस्टर सेमेन्याचे पहिलेवहिले जेतेपद

दक्षिण आफ्रिकेच्या कॅस्टर सेमेन्याने महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत बाजी मारून पहिल्यावहिल्या ऑलिम्पिक सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. तिने १ मिनिट ५५.२८ सेकंदाची वेळ नोंदवली. ‘‘हे पदक माझ्या संघाला समर्पण करते. त्यांची चोख कामगिरी बजावली. विजयाचा हा आनंद शब्दात मांडणे कठीण आहे,’’ असे मत कॅस्टरने व्यक्त केले. बुरुंडीच्या फ्रान्सिन नियोंसाबाने (१:५६.४९) रौप्य, तर केनियाच्या निआइरेरा मार्गारेट वाम्बुईनने (१:५६.८९) कांस्यपदक जिंकले.

 

रुथला ३७व्या वर्षी सुवर्णपदक

महिलांच्या उंच उडीत स्पेनच्या ३७ वर्षीय रुथ बेइटीयाने १.९७ मीटर उंच उडी मारून सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिक इतिहासात उंच उडी प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात वयस्क महिला खेळाडू ठरली. बल्गेरियाच्या मिरेला डेमिरेव्हा (१.९७ मी.) आणि क्रोएशियाच्या ब्लँका व्हॅलासिस (१.९७ मी.) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

 

सेंट्रोवित्जची ऐतिहासिक कामगिरी

पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीत अमेरिकेच्या मॅथ्यू सेंट्रोवित्जने ३ मिनिटे ५० सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदकाची कमाई केली. जवळपास शंभर वर्षांनंतर अमेरिकेच्या धावपटूने या क्रीडा प्रकारात पदक पटकावले. १९०८च्या लंडन ऑलिम्पिक स्पध्रेत मेल शेपर्ड यांनी १५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.

‘‘या सारखा विजय असूच शकत नाही. या विजयाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही,’’ असे सेंट्रोवित्ज म्हणाला. अल्जेरियाच्या तौफिक मखलूफीने ३: ५०.११ सेकंदांसह रौप्य, तर न्यूझीलंडच्या निकोलस विलिसने ३: ५०.२४ सेकंदांसह कांस्यपदक जिंकले. सेंट्रोवित्जने २०१३च्या विश्व अजिंक्यपद स्पध्रेत रौप्यपदकाची कमाई केली होती, तर लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

 

जर्मनीच्या थॉमस रोहलरची बाजी

पुरुषांच्या भालाफेक प्रकारात जर्मनीच्या थॉमस रोहलरने ९०.३० मीटर अंतर पार करून सुवर्णपदक पटकावले. विश्वविजेत्या केनियाच्या ज्युलियस येगोला (८८.२४ मी.) रौप्यपदकावर, तर गतविजेत्या केशॉर्न वलकॉटला (त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगो, ८५.८३ मी.) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

 

अमेरिकेचे सलग सहावे सुवर्ण

अमेरिकेच्या महिला बास्केटबॉल संघाने १०१-७२ गुणांनी स्पेनला नमवून ऑलिम्पिकमधील सलग सहावे सुवर्णपदक पटकावले. १९९२ सालानंतर अमेरिकेने सलग ४९ सामन्यांत विजय मिळवला.

 

वाढत्या स्पर्धेमुळे पीछेहाट झाल्याची चीनकडून कबुली

रिओ दी जानिरो ; जमैका, इंग्लंड, आदी देशांमधील खेळाडूंचा दर्जा उंचावला असून त्यांच्याकडून मिळणाऱ्या वाढत्या स्पर्धेमुळेच यंदा आम्हाला पदक तालिकेत पीछेहाट पाहावी लागली, अशी कबुली चीनचे पथक प्रमुख लिऊ पेंग यांनी सांगितले.

चीनचे यंदा ४१० खेळाडूंचे पथक होते. मात्र आतापर्यंत त्यांना जेमतेम २६ सुवर्णपदकांवर समाधान मानावे लागले आहे. पदक तालिकेत अमेरिकेपाठोपाठ यंदा इंग्लंडने दुसरे स्थान घेतले आहे. चीन तिसऱ्या स्थानावर आहे. चीनने २००८ मध्ये त्यांनी अव्वल स्थान मिळविले होते, तर २००४ व २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना दुसरा क्रमांक मिळाला होता.

‘‘आम्हाला यंदा अपेक्षेइतकी सुवर्णपदके मिळाली नाहीत. आम्ही कोठे चुकलो याचा अभ्यास करीत आहोत. अन्य देशांमधील खेळाडूंच्या कामगिरीत लक्षणीय प्रगती झाली आहे. केवळ अमेरिका नव्हे तर अन्य देशांच्या खेळाडूंना कसे चांगले यश मिळाले हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे. काही देशांनी आता ऑलिम्पिक स्पर्धानाही महत्त्व देण्यास प्रारंभ केला आहे,’’ असे पेंग यांनी सांगितले.

 

ग्रेट ब्रिटनच्या निकोलाने सुवर्णपदक राखले

ग्रेट ब्रिटनच्या निकोला अ‍ॅडम्सने बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक राखले व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. बॉक्सिंगमध्ये फ्लायवेट गटात विजेतेपद राखणारी ती पहिलीच महिला खेळाडू आहे. अ‍ॅडम्सने  अंतिम फेरीत फ्रान्सच्या सराह औराहमोनवर विजय मिळवला. तिने लंडन ऑलिम्पिकमध्ये अजिंक्यपद मिळवले होते.३३ वर्षीय अ‍ॅडम्स विजेतेपदानंतर कमालीची भावनिक झाली. ती म्हणाली, ‘‘विजेतेपद मिळवणे सोपे आहे मात्र ते राखणे खूप अवघड असते. माझ्या या कामगिरीचे श्रेय यॉर्कशायरमधील माझ्या चाहत्यांना द्यावे लागेल. त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिले.’’ यापूर्वी इंग्लंडच्या हॅरी मॅलीन यांनी १९२० व १९२४च्या ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग या क्रीडा प्रकारातील मिडलवेट गटात विजेतेपद मिळवले होते.

 

 

 

 

First Published on August 22, 2016 2:37 am

Web Title: mohamed farah in olympic games rio 2016