News Flash

नितेंद्र सिंह रावत

सहाव्या कुमॉन पथकाचा शिपाई अशी नितेंद्र सिंह रावत यांची ओळख आहे

नितेंद्र हा मुळचा उत्तराखंडमधला.

वय : २५

स्पर्धा : मॅरेथॉन

स्पर्धेची तारीख: २१ ऑगस्ट

दक्षिण कोरियातील जागतिक लष्करी क्रीडा स्पर्धेत आठवे स्थान,

सर्वोत्तम कामगिरी : आशियायी स्पर्धेत सहभागी

सहाव्या कुमॉन पथकाचा शिपाई अशी नितेंद्र सिंह रावत यांची ओळख आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याकरता ४२ किलोमीटरचे अंतर त्यांने केवळ २ तास १९ मिनिटांत पूर्ण केले होते. लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धेत थोन्नकल गोपी आणि खेता राम याला तो साथ देणार आहे. १९६० रोम ऑलिम्पिकनंतर लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत हे तिघेही भारताचे प्रतिनिधीत्त्व करणार आहेत. नितेंद्र हा मुळचा उत्तराखंडमधला. सुरिंदर सिंह भंडारी यांच्या प्रशिक्षणाखाली तो तयार झाला आहे. अतिशय आक्रमकता हे त्याचे स्वभावातले वैशिष्ट्ये. नुकत्याच झालेल्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत त्याने दहावा क्रमांक पटकावला होता. तसेच त्याला ५ लाखांचे पारितोषिकही मिळाले होते. मिळालेली रक्कम आपण प्रशिक्षणासाठी खर्च करणार असल्याचेही त्याने एका मुलाखतीत म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 3:34 pm

Web Title: nitendra singh rawat
Next Stories
1 अंकित शर्मा
2 लिएंडर पेस
3 संदीप तोमर
Just Now!
X