23 February 2019

News Flash

Badminton Score, PV Sindhu, Rio 2016 Olympics: पी.व्ही.सिंधूचा अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश

पी.व्ही.सिंधू विरुद्ध नोझोमी ओकूहारासोबतच्या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स

Live Badminton Score, PV Sindhu, Rio 2016 Olympics: PV Sindhu is looking to continue her great run at Rio 2016 Olympics. (Source: PTI)

रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने भारताला पहिले पदक जिंकून दिल्यानंतर आता महिला बॅडमिंटनमध्येही भारताचे पदक निश्चित झाले आहे. भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या नोझोमी ओकूहारा हिच्यावर २१-१९, २१-१० अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवून स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
दोघांमध्ये चुरशीची लढत यावेळी पाहायला मिळाली. पहिल्या सेटमध्ये सिंधूने चांगली सुरूवात करून आघाडी घेतली होती. मात्र, चपळतेच्या जोरावर नोझोमी ओकुहारानेही प्रत्युत्तर देत सामन्याला रंगत आणली. दोघांमध्येही १९ व्या गुणापर्यंत चढाओढ पाहायला मिळाली, मग पी.व्ही.सिंधूने अप्रतिम खेळी करत पहिला सेट २१-१९ असा जिंकला.
दुसऱया सेटमध्ये पी.व्ही.सिंधूचेच वर्चस्व पाहायला मिळाले. दुसऱया सेटमध्ये पहिले तीन गुण सहज जिंकून सिंधूने आघाडी घेतली. पण ओकुहाराने प्रत्युतरादाखल लागोपाठ तीन गुण पटकावून बरोबरी साधली. त्यानंतर पी.व्ही.सिंधूने सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत लागोपाठ गुणांची कमाई करून तब्बल ११ गुणांची आघाडी घेऊन दुसरा सेट २१-१० असा जिंकला आणि स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
पी.व्ही.सिंधूचे हे ऑलिम्पिक स्पर्धेचे पहिलेच वर्ष आहे आणि पहिल्याच प्रयत्नात सिंधूने अंतिम फेरी गाठून इतिहास घडवला. पी.व्ही.सिंधूच्या अंतिम फेरीतील प्रवेशामुळे महिला बॅडमिंटनमध्ये भारताचे पदक निश्चित आहे. पी.व्ही.सिंधूसमोर अंतिम फेरीत स्पेनच्या कारोनिला मारिनचे आव्हान असणार आहे.

Live Badminton Score:

# दुसरा सेट २१-१० असा जिंकून पी.व्ही.सिंधू अंतिम फेरीत दाखल

# दुसऱया सेटवर पी.व्ही.सिंधूची पकड, भारत २०-१०

# पी.व्ही.सिंधूकडे सात गुणांची दमदार आघाडी

# सिंधूच्या खात्यात लागोपाठ दोन गुण, भारताकडे सहा गुणांची आघाडी

# पी.व्ही.सिंधूचा आणखी एक उत्तम स्मॅश, भारताकडे चार गुणांची आघाडी

# पी.व्ही.सिंधूचा शानदार स्मॅश, भारत १३-१०

# सिंधूच्या खात्यात आणखी एक गुण, भारत १२-१०

# दुसऱया सेटमध्ये पी.व्ही.सिंधू केवळ एका गुणाने आघाडीवर, भारत ११-१० जपान

# नोझोमी ओकूहाराचा सुंदर शॉट, एका गुणाच्या फरकाने जपान आघाडीवर

# पी.व्ही.सिंधूचा दमदार स्मॅश, भारताकडे एका गुणाची आघाडी

# भारत ८-८ जपान

# नोझोमी ओकोहाराचे पुनरागमन, दोन्ही खेळाडूंच्या गुणांची बरोबरी

# पी.व्ही.सिंधूकडून सर्वोत्तम खेळी, भारताकडे ७-५ अशी आघाडी

# दुसऱया सेटमध्ये पुन्हा एकदा दोघांमध्ये चुरशीची लढत

# निराशाजनक सुरूवातीनंतर नोझोमीने घेतली आघाडी, पी.व्ही.सिंधू दोन गुणांनी पिछाडीवर

# जपानच्या खात्यात आणखी एक गुण, भारत ३-२ जपान

# जपानच्या नोझोमीने खाते उघडले, भारत ३-१ जपान

# पी.व्ही.सिंधूच्या खात्यात तीन गुण, भारत ३-० जपान

# दुसऱया सेटमध्येही पी.व्ही.सिंधूची दमदार सुरूवात, पी.व्ही.सिंधूकडे दोन गुणांची आघाडी

# दुसरय़ा सेटला सुरूवात

# पहिला सेट २१-१९ असा पी.व्ही.सिंधूने जिंकला.

# नोझोमीच्या खात्यात आणखी एक गुण

# पी.व्ही.सिंधूकडे २० गुण, सेट जिंकण्यासाठी केवळ एका गुणाची गरज

# पहिला सेट कोण जिंकणार? दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत

# दोन्ही खेळाडूंमध्ये केवळ एका गुणाचा फरक, भारत १८-१७ जपान

# दोन्ही खेळाडूंमध्ये अत्यंत चुरशीचा सामना, पी.व्ही.सिंधूकडून उत्कृष्ट खेळी

# पी.व्ही.सिंधूकडे दोन गुणांची आघाडी, सामना १५-१३ असा चुरशीचा

# नोझोमीकडून शानदार स्मॅश, भारत १२-१० जपान

# सिंधू आणि नोझोमीमध्ये चुरशीची लढाई, सिंधू चार गुणांनी आघाडीवर

# नोझोमीने पुन्हा एकदा लागोपाठ दोन गुण कमावले. भारत ११-८ जपान

# पी.व्ही.सिंधूकडे आता चार गुणांची आघाडी, भारत ११-६ जपान

# पी.व्ही.सिंधूचा दमदार स्मॅश, भारत १०-६ जपान

# पी.व्ही.सिंधूकडून उत्तम स्मॅश, भारत ९-६ जपान

# जपानच्या नोझोमीने कमावले लागोपाठ दोन गुण. भारत ८-६ जपान

# पी.व्ही.सिंधूकडे तीन गुणांची आघाडी, भारत ७-४ जपान

# नोझोमीचे पुनरागमन, पी.व्हीकडे आता फक्त एका गुणाची आघाडी

# रिव्ह्यू यशस्वी, सिंधू आघाडीवर ४-१

# पी.व्ही.सिंधूने रिव्ह्यू मागितला

# भारताचे खाते उघडले, पी.व्ही.सिंधूचा पहिला गुण

# दुसऱा गुण देखील नोझोमीच्या खात्यात, पी.व्ही.सिंधूची निराशाजनक सुरूवात

# पहिला गुण जपानच्या नोझोमीच्या खात्यात

# पी.व्ही.सिंधू कोर्टवर दाखल, थोड्याच वेळात सामन्याला सुरूवात.

# मत नोंदवा-

 

#  उपांत्य फेरीचा सामना खेळविल्या जाणाऱया कोर्टवर पी.व्ही.सिंधू पहिल्यांदाच खेळणार आहे. याआधीचे सामने पी.व्ही.सिंधू ‘रिओ-२’ कोर्टवर खेळली, आजचा सामना ‘रिओ-१’ या कोर्टवर खेळविण्यात येत आहे.

वाचा: पी.व्ही.सिंधूच्या वडिलांनी मुलीसाठी ८ महिन्यांची सुटी घेतली!

# दुसऱया उपांत्य फेरीत कोण बाजी मारणार?, भारताच्या पी.व्ही.सिंधूची लढत जपानच्या नोझोमी ओकूहारासोबत

# पहिल्या उपांत्य फेरीचा सामना स्पेनच्या कारोलिना मारिन हिने जिंकला.

First Published on August 18, 2016 6:58 pm

Web Title: pv sindhu vs nozomi okuhara badminton womens singles semifinal live updates rio 2016