भारताच्या दीपा कर्माकरने सोमवारी रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक  वॉल्टची अंतिम फेरी गाठत नवा इतिहास रचला. दीपा कर्माकर ही ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. दीपाने पात्रता फेरीत १४.८५० गुण मिळवत आठवे स्थान पटकावले. मात्र, अनइव्हन बार, बॅलेंसिंग बीम आणि फ्लोअर एक्सरसाईज या अन्य तीन प्रकारांत चमकदार कामगिरी करण्यात तिला अपयश आले. दीपाने अनइव्हन बारमध्ये  ११.६६६, बॅलन्सिंग बिममध्ये १२.८६६आणि फ्लोअर एक्सरसाईजमध्ये १२.०३३ गुणांची कमाई केली. अंतिम फेरीनंतर दीपा कर्माकर सहावे स्थान मिळवेल असे वाटत असतानाच कॅनेडियन प्रतिस्पर्ध्याच्या अफलातून सादरीकरणामुळे तिला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवणारी भारताची पहिलीवहिली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने व्होल्ट प्रकारात पहिल्या प्रयत्नांत १५.१०० गुणांची नोंद केली. डिफिकल्टीमध्ये ७.००० तर एक्झिक्युशनमध्ये तिने ८.१०० गुणांची कमाई केली. दुसऱ्या प्रयत्नात दीपाने १४. ६०० गुण मिळवले. यामध्ये डिफिकल्टीमध्ये ६.००० तर एक्झिक्युशनमध्ये ८.६०० गुण मिळवले. अनइव्हन बार प्रकारात ११.६६६ गुणांची कमाई केली. एकुण पाच उपविभागांतील कामगिरीच्या जोरावर तिने अंतिम फेरीत धडक मारली. आता १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत दीपा पदक मिळवण्यात यशस्वी ठरणार, का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
‘प्रोडय़ुनोव्हा’ हा जिम्नॅस्टिक्समधील सर्वात कठीण प्रकार मानला जातो. त्रिपुराची २२ वर्षीय दीपा हाच प्रकार ऑलिम्पिकमध्ये सादर करत आहे. २०१४च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकण्याची किमया साधली होती. हा पराक्रम साधणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. याचप्रमाणे हिरोशिमा येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिला कांस्यपदक मिळाले होते. २०१५च्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तिने अंतिम फेरी गाठली होती

मराठीतील सर्व रिओ २०१६ ऑलिम्पिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rio 2016 olympics dipa karmakar
First published on: 08-08-2016 at 05:04 IST