वय: २९

स्पर्धा : ८०० मी. धावणे (महिला गट)

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

स्पर्धेची तारीख: १७ ऑगस्ट

विक्रम: ८०० मी. धावण्याच्या स्पर्धेतील राष्ट्रीय विक्रमाची नोंद

सर्वोत्तम कामगिरी: २०१४ साली अर्जुन पुरस्काराची मानकरी. दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत ८०० मी धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई.

पी.टी. उषा हिच्यासारखीच प्रबळ इच्छाशक्ती असणारी खेळाडू म्हणून टिंटू लूका हिच्याकडे पाहिले जाते. ८०० मी आणि ४०० मी धावण्याच्या स्पर्धेत टिंटू लूका हिने आपली वेगळी छाप सोडली आहे. टिंटू लूका ही केरळची असून, ८०० मी. धावण्याच्या महिला गटातील राष्ट्रीय विक्रमाची नोंद तिच्या नावावर आहे. पी. टी. उषा हिच्या मार्गदर्शनाखाली ‘उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्स’मध्ये टिंटू लूका सराव करत आहे. गेल्या काही वर्षात देशासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणारी खेळाडू म्हणून टिंटूने आपली ओळख निर्माण केली आहे. रिओ ऑलिम्पिमध्ये देशासाठी पदकाची कमाई करण्याची टिंटूमध्ये कुवत असल्यानेच उषाने प्रशिक्षण देण्यासाठी टिंटूची निवड केली. भारत सरकारने २०१४ साली टिंटूला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. २०१२ सालच्या लंडन ऑलिम्पिकसाठीची पात्रता फेरी टिंटूला अपयश आले होते. पण तिने आपली इच्छाशक्ती न सोडता खेळात सातत्य राखून त्यानंतरच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली होती. ८०० मी. धावण्याच्या स्पर्धेतील राष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर आहे.