वेगाचा राजा म्हणून ओळख असलेला जागतिक विक्रमवीर धावपटू उसेन बोल्ट रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सज्ज झाला असून, यंदाच्या स्पर्धेत नवा विक्रम करण्याचा मानस असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यादृष्टीने बोल्टचा सराव देखील सुरू आहे. नुकतेच बोल्टने आपल्या सराव सत्रातून वेळ काढून ब्राझीलच्या लष्करी पथकासोबत फोटो शूट केले. उसेन बोल्टने सैनिकांसोबतचे छायाचित्र आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.  बोल्ट यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजयाची हॅट्ट्रीक साजरी करण्यासाठी सज्ज आहे. बोल्ट १०० मी, २०० मी आणि ४x१०० मी रिले प्रकारात धावताना दिसणार आहे.
२९ वर्षीय उसेन बोल्ट १३ ऑगस्ट रोजी १०० मीटर स्पर्धेत धावताना दिसेल. १०० आणि २०० मी धावण्याच्या स्पर्धेतील जागतिक विक्रम नावावर असणारा उसेन बोल्ट हा जगातील पहिलाच धावपटू आहे. याशिवाय, ४x१०० मी. रिले प्रकाराचा जागतिक विक्रम देखील बोल्टच्या नावावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व रिओ २०१६ ऑलिम्पिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usain bolt poses with brazilian navy
First published on: 04-08-2016 at 15:29 IST