Rohit Sharma Kuldeep Yadav Viral Video: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पटकावून भारतीय संघ मायदेशात दाखल झाला आहे. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत भारताने अजून एका आयसीसी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. रोहित शर्मा मैदानावर असताना सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंना ओरडताना फिल्ड सेट करताना आपण पाहिलं आहे. तर या टूर्नामेंटमध्ये रोहित शर्मा दोन सामन्यांमध्ये कुलदीप यादववर संतापलेला आपण पाहिलं. पण संघाच्या विजयानंतर पांढरं जॅकेट स्वीकारत असतानाही रोहित शर्मा कुलदीपवर वैतागला होता, पण कॅमेरा पाहताच रोहितने स्वत:ला आवरलं. नेमकं काय घडलं पाहूया.

भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कुलदीपला उपांत्य आणि अंतिम दोन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माच्या रागाला सामोरे जावे लागले. कुलदीपला दोन्ही सामन्यांमध्ये दोनदा धावबाद करण्याची संधी होती, पण त्याने चेंडू न पकडल्याने स्टंपच्या बाजूने चेंडू निघून गेला. त्यामुळे सिनियर खेळाडू त्याच्यावर वैतागलेले दिसले. अंतिम सामन्यात तर रोहितने “तू स्टंपच्या इथे का नाही येत रे…” असं म्हणत त्याला जाब पण विचारला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर दोन्ही संघांना प्रथम बीसीसीआयचे सचिन देवजीत सैकिया यांच्याकडून मेडल्स देण्यात आले. यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नीकडून भारताच्या विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला पांढरं खास ब्लेझर देत होते. प्रत्येक खेळाडूला रॉजर बिन्नी स्वत: हे ब्लेझर घालत होते. यादरम्यान रोहित शर्मा कुलदीप यादवकडे रागाने पाहत होता.

भारताच्या संघातील प्रत्येक खेळाडू एकेक करून पांढरं ब्लेझर घालत होते. रोहित शर्मा कर्णधार म्हणून सर्वात शेवटी होता, तर त्याच्यापुढे कुलदीप यादव होता. कुलदीप यादवला जॅकेट घालायला बराच वेळ लागत होता आणि त्याचा हाताचा भाग अडकत होता. कुलदीपला वेळ लागत असलेला पाहून रोहित शर्मा वैतागला आणि कुलदीपकडे रागात पाहू लागला. पण रोहित काही बोलायला जाण्याआधीच त्याने कॅमेरा पाहिला आणि तितक्यात कुलदीप पण ब्लेझर घालून पुढे गेला. रोहित शर्माचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुलदीपने ७ चेंडूमध्ये आपल्या फिरकीच्या जोरावर सामना भारताच्या बाजूने फिरवला. कुलदीपने त्याच्या स्पेलमधील पहिल्या चेंडूवर रचिन रवींद्रला ३७ धावांवर क्लीन बोल्ड केलं. रचिन संघासाठी घातक ठरत होता. तर पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने केन विलियमसनला झेलबाद करत किवी संघाचं कंबरडं मोडलं. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात दोन महत्त्वाच्या विकेट घेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली.