Rohit Sharma Ritika Sajdeh Viral Video: टीम इंडियाच्या वनडे संघाचा कर्णधार आणि मुंबईचा राजा अशी आपली ओळख बनवणारा रोहित शर्मा क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्का असतो. रोहित शर्माचं बिनधास्त वागणं, बोलणं आणि एकंदरीत त्याचा स्वभाव चाहत्यांना प्रचंड भावतो. असाच रोहितने एक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
रोहित शर्मा आता पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी तयारी करत आहे. त्याने फिटनेस टेस्ट देखील दिली आणि त्यात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. दरम्यान रोहितने त्याचं वजन घटवलं आहे. यामुळे देखील तो चर्चेत आहे. दरम्यान रोहितने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हीडिओमध्ये काही BTS त्याने शेअर केले आहेत. यामध्ये तो पत्नी रितिका सजदेहची मस्करी करत आहे.
रोहित त्याच्या बिनधास्त साठी खूप प्रसिद्ध आहे. मैदानावर खेळाडूंना सांभाळण्याची त्याची पद्धत, त्याचा संवाद, बोलणं स्टंप माईकवर रेकॉर्ड होऊन क्षणात व्हीडिओ व्हायरल होतात. तो ज्या प्रकारची भाषा आणि शब्द वापरतो ते ऐकून लोक खूप हसतात. दरम्यान रोहितबरोबर मस्करी करणारी त्याची मॅनेजर पत्नी रितिका सजदेह आणि त्याच्या टीमची तो चांगलीच फिरकी घेताना दिसला.
रोहित शर्मा-रितिका सजदेहचा भन्नाट व्हीडिओ होतोय व्हायरल
रोहित जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी रितिका त्याला त्रास द्यायचं ठरवले, परंतु ते तिच्यावरचं उलटतं. हिटमॅन खोलीतून बाहेर पडल्यानंतर, रितिका लगेच जाऊन दार बंद करते, पण रोहित शर्माला समजतं की रितिका त्याची मस्करी करतेय. रोहित आत आल्यावर लगेच तिला आणि टीमला म्हणतो. “या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुमचा बाप आहे.” हे ऐकून सर्वच जण हसू लागतात. याशिवाय संपूर्ण व्हीडिओमध्ये रोहितने अनेक मजेशीर वाक्य बोलली आहेत. त्यामुळे हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. रोहित शर्मा या व्हीडिओमध्ये नक्कल करतानाही दिसला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिकेतून रोहित शर्मा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. आयपीएल २०२५ मध्ये तो अखेरचा क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसला होता. २०२७ च्या वनडे वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असणार आहे. भारताचे दोन्ही दिग्गज खेळाडू रोहित आणि विराट या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसतील.