दुखापतींपेक्षा संघाला जास्त महत्त्व देत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज रायन हॅरिस याने आपल्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया महत्त्वपूर्ण दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नुकत्याच झालेल्या अ‍ॅशेस मालिकेच्या विजयाचा नायक आणि हॅरिस सिडनीमध्ये झालेल्या अखेरच्या सामन्यात  सामनावीर ठरला होता.
‘‘माझा गुडघा थोडासा दुखावला आहे. त्यावर काही दिवसांमध्ये शस्त्रक्रिया करावी लागणार असली तरी माझी ही दुखापत गंभीर स्वरूपाची नाही. गेल्या सहा आठवडय़ांपूर्वीही माझी स्थिती तशीच होती. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर बराच मोकळा अवधी मिळणार असून त्या वेळी मी गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेईन. मला संघाबरोबर जास्तीत जास्त काळ राहायचे आहे,’’ असे हॅरिसने सांगितले.