लाखो क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे आणि क्रिकेटच्या खेळाविषयी असणारी श्रद्धा तब्बल दोन दशकांहून अधिक काळ जपणारा सचिन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रदर्शनापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’च्या प्रिमियरला हजेरी लावली. यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने देखील सचिनच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहिला. धोनीने या चित्रपटाचे कौतुक केले आहे. सचिनच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे शीर्षक अधिक भावल्याचे तो एका मुलाखतीमध्ये म्हणाला. तसेच सचिनसारख्या आयुष्यातील आठवणी जपता आल्या नाहीत, असेही त्याने बोलून दाखवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धोनी म्हणाला की, सचिनच्या मैदानातील खेळीला क्रिकेट चाहत्यांकडून मिळालेले प्रेम सर्वांना माहिती आहे. या चित्रपटात अनेक गोष्टी आहेत की, ज्यामुळे युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल. सचिनचा प्रवास हा उत्तमरित्या मांडण्यात आला आहे. सचिनची पत्नी अंजली तेंडुलकरला या चित्रपटात पाहायला मिळणे, ही देखील खूप चांगली गोष्ट असल्याचे धोनी म्हणाला.
या चित्रपटात सचिनच्या आयुष्यातील कुटुंबिय आणि मित्रांसोबतचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सचिनच्या आठवणीला उजाळा देणाऱ्या या व्हिडिओमुळे चित्रपट अधिक दमदार झाला आहे. धोनीच्या जीवनावर ‘एम. एस. धोनी- अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

वाचा : Sachin A Billion Dreams Review: फक्त आणि फक्त ‘सचिन… सचिन… सचिन…’

[jwplayer 6OF4tpFS]

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin a billion dreams screening ms dhoni reaction
First published on: 26-05-2017 at 13:01 IST