Sachin Tendulkar’s 50th Birthday: सोमवारी म्हणजे २४ एप्रिलला सचिन तेंडुलकरचा ५०वा वाढदिवस आहे. या निमित्ताने आपण वयाचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या सचिनच्या आयुष्यात मँचेस्टरमध्ये घडलेला एक खास किस्सा जाणून घेणार आहोत. आपल्या लहानपणापासून शिकवले जाते की, जी गोष्ट आपली नाही ती उघडू नये किंवा तिला स्पर्श करू नये. पण, सचिन तेंडुलकरला मिळालेला पुरस्कार हा त्याचाच होता. तो त्याचा मालक होता. पण, त्यानंतरही त्याला ते उघडण्यास मनाई करण्यात आली होती.

त्यावर बंदी का घालण्यात आली होती? ती कोणत्या कारणास्तव बंदी होती? ते सांगणार आहोत. पण त्याआधी मास्टर ब्लास्टरला कोणता पुरस्कार मिळाला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.जो पुरस्कार सचिन तेंडुलकरला उघडपणे पाहता आला नाही, तो त्याला इंग्लंडच्या भूमीवर शतक झळकावल्यामुळे मिळाला होता. ही गोष्ट त्यावेळची आहे, जेव्हा सचिन नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला होता. त्याचं वयही फारसं नव्हतं.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

पहिल्या कसोटी शतकासाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला होता –

वर्ष होते १९९० आणि ते मैदान म्हणजे इंग्लंडमधील मँचेस्टर, जे सचिन तेंडुलकरच्या पहिल्या कसोटी शतकाचे साक्षीदार होते. तेव्हा १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या सचिनने या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात शतक झळकावले होते. त्याने भारताच्या दुसऱ्या डावात १८९ चेंडूंचा सामना करताना ११९ धावांची खेळी केली होती. त्यावेळी इंग्लंडच्या ४०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सामना अनिर्णित राहिला होता.

सचिनचे वय कमी असल्याने त्याला शॅम्पेन उघडता आली नाही –

सचिन तेंडुलकरला त्याच्या पहिल्या आणि अतुलनीय कसोटी शतकासाठी सामनावीर पुरस्कार मिळाला. त्याला शॅम्पेनची बाटली भेट देण्यात आली. पण, नाइलाजाने, तो ती बाटली उघडू शकत नव्हता. कारण इंग्लंडमध्ये शॅम्पेनची बाटली उघडून ती पिण्याचे कायदेशीर वय १८ वर्षे होते, त्यानुसार सचिनचे वय लहान होते. त्यामुळे सचिनने ती शॅम्पेनची बाटली उघडली नाही. पण त्याने तिला सांभाळून घरी आणले. आणि, ८ वर्षांनी १९९८ मध्ये त्याची मुलगी साराच्या पहिल्या वाढदिवसाला उघडली.

५१ कसोटी शतकांचा प्रवास मँचेस्टरपासून सुरू झाला –

सचिनच्या कसोटी शतकांचा प्रवास १९९० मध्ये मँचेस्टरपासून सुरू झाला. त्यानंतर हा प्रवास ५१ शतकांवर संपला. म्हणजेच त्याने कसोटी क्रिकेटमधील शतकांचे अर्धशतक पूर्ण केले. हा विक्रम मोडने कोणत्याही फलंदाजासाठी मोठे आव्हान असेल.